• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

“……तर 100 टक्के आमचा उमेदवार उभा राहील!” संपर्कप्रमुख दिलीप लांडे यांच्या जळगावच्या दौऱ्यात विधानपरिषदेसाठी शिवसेनेचं नेमकं काय ठरलं?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 26, 2026
in जळगाव जिल्हा, खान्देश, जळगाव शहर, ताज्या बातम्या
“……तर 100 टक्के आमचा उमेदवार उभा राहील!” संपर्कप्रमुख दिलीप लांडे यांच्या जळगावच्या दौऱ्यात विधानपरिषदेसाठी शिवसेनेचं नेमकं काय ठरलं?

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

जळगाव, 26 मे: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील १७ जागांसाठी विधान परिषद निवडणुकीची प्रक्रिया पार पडत असताना महायुतीमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागेसाठी भाजप आणि शिवसेना या महायुतीतील दोन्ही घटक पक्ष आग्रही आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून शिवसेनेचे लोकसभा संपर्कप्रमुख दिलीप लांडे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत जळगावची जागा कोणत्याही परिस्थितीत लढवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

जळगावात पार पडली शिवसेनेची बैठक –

शिवसेनेचे लोकसभा संपर्कप्रमुख दिलीप लांडे हे दोन दिवसापासून जळगाव दौऱ्यावर होते. अशातच जळगावच्या जागेचा तिढा सुरू असताना त्यांच्या उपस्थितीत जळगावातील एका खाजगी हॉटेलमध्ये राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह शिवसेना आमदारांची आणि प्रमुख नेत्यांची महत्त्वाची गोपनीय बैठक पार पडली. या बैठकीत विधानरपरिषद निवडणुकीसंदर्भात विविध विषयांवर तब्बल तासभर चर्चा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

जळगावची जागा लढवण्यासाठी शिवसेनेचे एकमत –

जळगावात पार पडलेल्या या बैठकीत जळगाव विधान परिषदेची जागा शिवसेनेनेच लढवावी यावर सर्व नेत्यांचे एकमत झाले. भाजपने ही जागा सोडण्यास नकार दिल्यास, महायुतीमध्ये ‘मैत्रीपूर्ण लढत’ करण्याची तयारी शिवसेनेने दर्शवली आहे. यासाठी शिवसेना आमदारांचे शिष्टमंडळ आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेणार आहेत.

“……तर 100 टक्के आमचा उमेदवार उभा राहील!” –

हॉटेलमध्ये पार पडलेल्या बैठकीनंतर आमदार किशोर आप्पा पाटील यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, जळगाव विधान परिषदेची जागा शिवसेनेनेच लढवावी यावर सर्व नेत्यांचे एकमत झाले आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव विधानपरिषदेची जागा ही भाजपने मोठा भाऊ म्हणून शिवसेनेचा अट्टहास म्हणून सोडावी. जर महायुती म्हणून शिवसेनेला जागा नाही मिळाली तर आम्हाला जळगावात मैत्रीपुर्ण लढतीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी आम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार आहोत.

दरम्यान, जर आम्हाला मैत्रीपुर्ण लढतीसाठी परवानगी मिळाली तर 100 टक्के शिवसेनेचा उमेदवार उभा राहील आणि कुठल्याही परिस्थितीत निवडून येईल अशापद्धतीचे एकमत जळगाव जिल्ह्यातील शिवसेना नेते, आमदार तसेच प्रमुख पदाधिकारी यांचे झाले असल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले.

शिवसेना आमदार आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार –

जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागा ही शिवसेनेला मिळावी, यासाठी जळगाव जिल्ह्यातील शिवसेना आमदारांचे शिष्टमंडळ आज 26 मे रोजी ताततडीने एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचीही माहिती काल पार पडलेल्या बैठकीनंतर समोर आली आहे. दरम्यान, जळगावात तापलेल्या राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर महायुतीत नेमका कोणता निर्णय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: “गेल्या 25 ते 30 वर्षांपासून ती जागा आमची आणि म्हणून…..!”, विधानपरिषदेसाठी जळगावच्या जागेबाबत मंत्री गिरीश महाजन यांचं विधान

बातमी शेअर करा !
Share
Tags: dilip lande¸ vidhan parishad election 2026marathi newsshivsena meetingsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 11, 2026
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page