• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 30, 2026
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, भुसावळ
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळ, 30 मे: जळगाव जिल्ह्यातील लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली असताना मोठी बातमी समोर आली आहे. भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात एका खासगी व्यक्तीचाही समावेश असून दोघांना फरार घोषित करण्यात आले आहे.

पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे (बाजारपेठ पोलीस ठाणे, भुसावळ) आणि सलीम हकीम कुरेशी (रा. बोदवड) अशी संशयितांची नावे आहेत. दोघांनी मिळून तक्रारदाराकडून 30 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. नंतर ही रक्कम २० हजार रुपयांवर ठरविण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

नेमकं प्रकरण काय? –

मिळालेल्या माहितीनुसार, 28 मार्च रोजी तक्रारदार आणि त्याच्या मित्राचा एका व्यक्तीसोबत पैशांच्या व्यवहारावरून किरकोळ वाद झाला होता. या प्रकरणात तक्रारदार आणि त्याच्या मित्राविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे आणि सलीम कुरेशी यांनी तक्रारदाराच्या पत्नीमार्फत लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले.

तपासादरम्यान, तक्रारदाराला अटक न करता केवळ ‘चॅप्टर केस’ करून सोडून देण्यासाठी २० हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविण्यात आल्याचेही आढळून आले. प्रत्यक्ष लाचेची रक्कम स्वीकारली गेली नसली, तरी लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, हेमंत नागरे, उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील तसेच अमोल पाटील, भूषण पाटील यांच्या पथकाने यशस्वी केली. दरम्यान, भ्रष्टाचारसंबंधी काही माहिती असल्यास अथवा लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल काही तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकुर यांनी केले आहे.

हेही वाचा:  बळीराजाची चिंता वाढली! भारतीय हवामान विभागाकडून मान्सून हंगामाबाबतचा दुसरा सुधारित अंदाज जाहीर, ‘यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी’

बातमी शेअर करा !
Share
Tags: bhusawal newsbribe case bhusawaljalgaon anti-corruptionmarathi newspolice sub inspectorsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

August 29, 2026
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

August 29, 2026
‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

August 29, 2026
‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

August 29, 2026
सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

August 29, 2026
कुंभमेळ्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

कुंभमेळ्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

August 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page