• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

रखडलेला मान्सून अखेर बरसला; महाराष्ट्रभर पावसाचा जोर, जळगाव जिल्ह्याचा पावसाचा अंदाज नेमका काय?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 25, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
रखडलेला मान्सून अखेर बरसला; महाराष्ट्रभर पावसाचा जोर, जळगाव जिल्ह्याचा पावसाचा अंदाज  नेमका काय?

जळगाव, 25 जून: दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर जळगाव जिल्ह्यात मान्सूनचे दमदार आगमन झाले असून, पुढील तीन दिवस जळगावसह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच मुंबई-कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. दरम्यान, उन्हाच्या तीव्र झळा आणि पावसाचा लांबलेला खंड यांमुळे खरिपाच्या पेरण्या संकटात सापडल्या असतानाच, वरुणराजाने राज्यभर जोरदार हजेरी लावल्यामुळे चिंतेत असलेला बळीराजा सुखावला आहे.

जळगाव जिल्ह्यातील विविध भागात पावसाची हजेरी –

जळगाव जिल्ह्यात तब्बल 20 दिवसांच्या मोठ्या विलंबाने अखेर २४ जून रोजी मान्सूनचे आगमन झाले आहे. जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत पडला होता आणि चातकासारखी पावसाची वाट पाहत होता. मात्र, 23 आणि २४ जूनच्या दुपारनंतर वातावरणात अचानक बदल झाला आणि जळगाव शहर, पाचोरा, भडगाव, अमळनेर, मुक्ताईनगर तसेच जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

राज्यात पुढील तीन दिवस पावसाचे –

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस महाराष्ट्रील विविध भागात पावसाचा जोर कायम राहणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. समुद्रकिनारी ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहतील. पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट माथ्यावर तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांत मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा व मध्य तसेच उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज नेमका काय? –

जळगाव जिल्ह्यात पुढील 3 दिवस ढगाळ वातावरण राहील आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने दुपारनंतर पावसासाठी वातावरण अधिक अनुकूल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आगामी तीन दिवसांत जिल्ह्याचे कमाल तापमान ३३°C ते ३४°C आणि किमान तापमान २५°C च्या आसपास राहण्याची शक्यता  आहे.

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला –

दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर वरुणराजाने राज्यभरात जोरदार हजेरी लावल्यामुळे चिंतेत असलेला बळीराजा सुखावला आहे. उन्हाच्या तीव्र झळा आणि पावसाचा लांबलेला खंड यांमुळे खरिपाच्या पेरण्या संकटात सापडल्या होत्या. मात्र, मान्सूनने पुन्हा गती घेत संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान आहे. समाधानकारक पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने शेतीकामांना वेग येणार आहे.

हेही वाचा: कर्जमाफी योजनेत जुने लाभार्थीही येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन; लवकरच घेतला जाणार निर्णय

बातमी शेअर करा !
Share
Tags: daily rain updateimdjalgoan weather updatemaharastra heavy rainmonsoon

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दिवेआगर दुर्घटना प्रकरण; आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

दिवेआगर दुर्घटना प्रकरण; आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

October 2, 2026
आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

October 2, 2026
पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द ग्रामपंचायतीच्या विकासकामांची चौकशी होणार; प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे

पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द ग्रामपंचायतीच्या विकासकामांची चौकशी होणार; प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे

October 2, 2026
‘ज्येष्ठ नागरिक ही देशाची संपत्ती!’; समाज कल्याण विभागाच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात संपन्न

‘ज्येष्ठ नागरिक ही देशाची संपत्ती!’; समाज कल्याण विभागाच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात संपन्न

October 2, 2026
दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर

दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर

October 2, 2026
मोठी बातमी! जि.प. शाळा आणि अंगणवाड्यांचा कायापालट होणार; ग्रामपंचायतींच्या ‘जनसुविधा’ निधीतून मिळणार लाखो रुपयांचा निधी

मोठी बातमी! जि.प. शाळा आणि अंगणवाड्यांचा कायापालट होणार; ग्रामपंचायतींच्या ‘जनसुविधा’ निधीतून मिळणार लाखो रुपयांचा निधी

October 1, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page