• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

अवैध सावकारीविरोधी कायदा आणखी कडक करणार; मंत्री बाबासाहेब पाटील यांची विधानसभेत माहिती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 30, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
अवैध सावकारीविरोधी कायदा आणखी कडक करणार; मंत्री बाबासाहेब पाटील यांची विधानसभेत माहिती

मुंबई, 29 जून: राज्यातील बेकायदेशीर सावकारीला आळा घालण्यासाठी कायद्यात आणखी कडक तरतुदी करण्यात येणार असून पूर्वीच्या कायद्यापेक्षा अधिक कठोर शिक्षा देण्याची तरतूद नव्या कायद्यात केली जाईल, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

मंत्री बाबासाहेब पाटील काय म्हणाले? –

सहकार मंत्री पाटील म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांना सुलभ कर्ज पुरवठा, बेकायदेशीर सावकारीवर कठोर नियंत्रण आणि तक्रारींवर प्रभावी कारवाई करून शेतकऱ्यांचे हित जोपासण्यास राज्य शासनाने सर्वोच प्राधान्य दिले आहे. कोणताही पात्र शेतकरी कर्जापासून वंचित राहणार नाही, असे सांगत मंत्री पाटील म्हणाले की, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे कर्ज थकीत असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज मिळण्यात अडचणी येत आहेत, अशा शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँका व इतर पात्र बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

अमरावती जिल्ह्यात अवैध सावकारी विरोधात मोठ्याप्रमाणावर कारवाई सुरू आहे. प्राप्त झालेल्या ३४३ तक्रारींपैकी २६६ प्रकरणांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ३४ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ४८ आरोपींवर कारवाई करण्यात येत आहे. महाराष्ट्र सावकारी  कायद्याअंतर्गत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अमरावती कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या ५४ तक्रारींपैकी ४४ प्रकरणांचा निकाल लावण्यात आला आहे. संबंधित प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत असल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

अवैध सावकारीला प्रतिबंध घालण्यासाठी तसेच अवैध सावकारांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी जिल्हास्तरीय त्रिसदस्यीय प्रशासकीय समिती नेमण्यात आली आहे. तसेच, जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीच्या माध्यमातून पीक कर्ज मंजुरी व वितरण या कार्यवाहीवर देखरेख ठेवण्यात येत आहे. त्याचबरोबर या बाबींचा वेळोवेळी आढावा घेण्यात येत असल्याचेही सहकार मंत्री पाटील यांनी सांगितले.

सदस्य सुलभा खोडके यांनी या विषयी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य कैलास पाटील, नाना पटोले, हरीश  पिंपळे, हेमंत ओगले, विजय वडेट्टीवार यांनीही उपप्रश्न विचारले.

हेही वाचा: VIDEO | शेतकरी कर्जमाफीवर मोठी अपडेट; ३० जूनबाबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे काय म्हणाले?

बातमी शेअर करा !
Share
Tags: illegal moneylendingmarathi newsminister babasaheb patilmonsoon session 2026suvarna khandesh livevidhansabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर एक लाख रुपयांपर्यंत दंड; नियमांचे पालन न झाल्यास संबंधित शाळेची मान्यता होणार रद्द – मंत्री दादाजी भुसे

मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर एक लाख रुपयांपर्यंत दंड; नियमांचे पालन न झाल्यास संबंधित शाळेची मान्यता होणार रद्द – मंत्री दादाजी भुसे

June 30, 2026
भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची! वारकऱ्यांच्या ‘चरण सेवेला’ प्रारंभ; मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा उपक्रम

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची! वारकऱ्यांच्या ‘चरण सेवेला’ प्रारंभ; मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा उपक्रम

June 30, 2026
VIDEO | नसरापूर घटना प्रकरणात आरोपीला फाशी; 59 दिवसांत संपूर्ण न्यायप्रक्रिया पूर्ण, वेगवान न्यायदानाचा नवा बेंचमार्क – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

VIDEO | नसरापूर घटना प्रकरणात आरोपीला फाशी; 59 दिवसांत संपूर्ण न्यायप्रक्रिया पूर्ण, वेगवान न्यायदानाचा नवा बेंचमार्क – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 30, 2026
अवैध सावकारीविरोधी कायदा आणखी कडक करणार; मंत्री बाबासाहेब पाटील यांची विधानसभेत माहिती

अवैध सावकारीविरोधी कायदा आणखी कडक करणार; मंत्री बाबासाहेब पाटील यांची विधानसभेत माहिती

June 30, 2026
VIDEO | शेतकरी कर्जमाफीवर मोठी अपडेट; ३० जूनबाबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे काय म्हणाले?

VIDEO | शेतकरी कर्जमाफीवर मोठी अपडेट; ३० जूनबाबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे काय म्हणाले?

June 29, 2026
जळगावात राजर्षी शाहू महाराज जयंती पर्वानिमित्त जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहिमेचे आयोजन

जळगावात राजर्षी शाहू महाराज जयंती पर्वानिमित्त जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहिमेचे आयोजन

June 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page