• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पाच हजारांहून अधिक कुटुंबांना लाभ देण्याचे उद्दिष्ट

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 16, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
जळगाव जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

जळगाव, 16 जुलै: महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्यासाठी जळगाव जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. अभियानाच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात, जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे यांनी आज माहिती दिली.

महसूल विभागाच्या शासन निर्णयानुसार या अभियानाच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. सुरुवातीला दि. २२, २५ व २६ जुलै २०२६ या तीन दिवसांपैकी एका दिवशी शिबीर आयोजित करण्याचे नियोजित होते. मात्र, दि. २५ जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने राज्यातील नागरिक व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होणार आहेत. त्यानुसार आता दि. २२ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत कोणत्याही एका दिवशी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात शिबीर आयोजित करता येणार आहे.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील शिबिरासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रत्येक मतदारसंघात किमान पाच हजार कुटुंबांना, तर संपूर्ण महाराष्ट्रात दहा लाख कुटुंबांना लाभ देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

नागरिकांना एकाच छताखाली विविध सेवांचा लाभ –

समाधान शिबिरांच्या माध्यमातून तळागाळातील नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या सेवांचा लाभ विनाविलंब दिला जाणार आहे. राज्यातील महिलांना शेतकरी दर्जाचे प्रमाणपत्र वाटप, गावठाण जागेचे वाटप व नागरिकांना स्वामित्व सनद देणे, ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’, शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करणे तसेच महसूल विभागामार्फत ‘जिवंत सातबारा’ मोहीम राबविण्यात येणार आहे.

निवासी व व्यावसायिक जमिनी फ्री-होल्ड करण्यासाठी ‘विशेष अभय योजना-२०२५’ला मुदतवाढ देणे आणि शेतजमिनीच्या कौटुंबिक वाटपपत्रावरील नोंदणी फी पूर्णपणे माफ करण्यावरही भर दिला जाणार आहे. कुंभार समाजातील व्यक्तींना पारंपरिक व्यवसायासाठी सवलती, ‘राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना’ तसेच समाजातील वंचित व अनाथ घटकांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

जिल्हा प्रशासनाकडून पूर्वतयारी –

अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर यांच्या अध्यक्षतेखाली महसूल, कृषी, जिल्हा परिषद आणि लीड बँक या प्रमुख विभागांची आढावा बैठक घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागांना पात्र लाभार्थ्यांची तालुकानिहाय व योजनानिहाय माहिती सादर करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.

महसूल मंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी स्वतः या शिबिरांना उपस्थित राहून ‘सेवा सप्ताह’ म्हणून अभियानाचे नियंत्रण करणार आहेत. अभियानात स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, कलाकार, साहित्यिक, क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांना सक्रिय सहभागी करून घेतले जाणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी व पात्र लाभार्थ्यांनी दि. २२ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आयोजित होणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचा’ लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा:  VIDEO | कापूस क्रांतीची नवी दिशा! कमी अंतरावरील घनलागवडीने उत्पादनवाढीसाठी कृषी विभागाचा प्रयत्न; पाचोरा तालुक्यात 1 हजार 280 हेक्टरवर प्रयोग

बातमी शेअर करा !
Share
Tags: chhatrapati shivaji maharaj maharajswa samadhan shibir abhiyanias rohan ghugejalgaon newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pachora News: पाचोरा येथे विज्ञान प्रदर्शनात एस.एस.एम.एम. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची चमकदार कामगिरी

Pachora News: पाचोरा येथे विज्ञान प्रदर्शनात एस.एस.एम.एम. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याची चमकदार कामगिरी

November 2, 2026
VIDEO | भोकर SBI बँक दरोडा प्रकरण; कारागृहातून बडतर्फ पीएसआयने रचला कट, 36 कोटी 48 लाखांच्या मुद्देमालासह चार आरोपींना अटक

VIDEO | भोकर SBI बँक दरोडा प्रकरण; कारागृहातून बडतर्फ पीएसआयने रचला कट, 36 कोटी 48 लाखांच्या मुद्देमालासह चार आरोपींना अटक

November 2, 2026
लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक! बनावट वेबसाइटपासून सावध राहण्याचे आवाहन

लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली फसवणूक! बनावट वेबसाइटपासून सावध राहण्याचे आवाहन

October 30, 2026
“वडिलांचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी, शेतकऱ्यांसाठी उत्तम काम करणार”, JDCC बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर सुमित पाटील यांचा निर्धार

“वडिलांचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी, शेतकऱ्यांसाठी उत्तम काम करणार”, JDCC बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर सुमित पाटील यांचा निर्धार

October 29, 2026
धानवड ग्रामपंचायतीला कुलूप, ग्रामपंचायत अधिकारीही गैरहजर; जळगावच्या ZP CEO करिश्मा नायर यांनी केली थेट निलंबनाची कारवाई

धानवड ग्रामपंचायतीला कुलूप, ग्रामपंचायत अधिकारीही गैरहजर; जळगावच्या ZP CEO करिश्मा नायर यांनी केली थेट निलंबनाची कारवाई

October 29, 2026
पशुसंवर्धन विभागाचे काटेकोर नियोजन; दुष्काळग्रस्त 305 तालुक्यांत पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी करण्याचे आवाहन

पशुसंवर्धन विभागाचे काटेकोर नियोजन; दुष्काळग्रस्त 305 तालुक्यांत पशुधनाची ‘भारत पशुधन’ प्रणालीवर नोंदणी करण्याचे आवाहन

October 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page