• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

VIDEO | कापूस क्रांतीची नवी दिशा! कमी अंतरावरील घनलागवडीने उत्पादनवाढीसाठी कृषी विभागाचा प्रयत्न; पाचोरा तालुक्यात 1 हजार 280 हेक्टरवर प्रयोग

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 14, 2026
in पाचोरा, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
VIDEO | कापूस क्रांतीची नवी दिशा! कमी अंतरावरील घनलागवडीने उत्पादनवाढीसाठी कृषी विभागाचा प्रयत्न; पाचोरा तालुक्यात 1 हजार 280 हेक्टरवर प्रयोग

पाचोरा, 14 जुलै: वाढता उत्पादन खर्च आणि घटती उत्पादकता या दुहेरी संकटाचा सामना करणाऱ्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने आता नव्या तंत्रज्ञानाची कास धरली आहे. पारंपरिक लागवड पद्धतीला पर्याय म्हणून कमी अंतरावरील घनलागवडीचा प्रसार करण्यासाठी राज्यभर ‘कापूस क्रांती’ अर्थात कापूस उत्पादकता अभियान राबविण्यात येत आहे. राज्यातील निवडक १६ जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या या उपक्रमाला पाचोरा तालुक्यातही चांगला प्रतिसाद मिळाला असून, १२८ शेतकरी गटांनी १,२८० हेक्टर क्षेत्रावर घनलागवडीचा प्रयोग राबविला आहे.

कृषी विभागाचे कापूस उत्पादकता अभियान –
पारंपरिक पद्धतीत कापसाची लागवड ४ बाय ४ किंवा २ बाय २ फुटांच्या अंतरावर केली जाते. मात्र, या अभियानात सुमारे ३ फूट × १. 0 फूट अंतरावर घनलागवड (Closer Spacing) करण्यावर भर देण्यात आला आहे. कमी अंतरामुळे प्रति एकर झाडांची संख्या वाढते आणि योग्य व्यवस्थापन केल्यास उत्पादनातही वाढ होण्याची अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

या अभियानांतर्गत आत्मा (ATMA) अंतर्गत नोंदणीकृत शेतकरी गट, महिला बचत गट तसेच पाणी फाउंडेशनशी संलग्न गटांना प्राधान्याने सहभागी करून घेण्यात आले. महाडीबीटी पोर्टलवर पात्र ठरलेल्या गटांना कृषी विभागामार्फत विनामूल्य कापूस बियाण्यांचे वाटप करण्यात आले.

पाचोरा तालुक्यात 1 हजार 280 हेक्टरवर प्रयोग –
कृषी विभागाने हाती घेतलेल्या या प्रकल्पामध्ये प्रत्येक गटासाठी २५ एकर (१० हेक्टर) क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. पाचोरा तालुक्यात एकूण १२८ शेतकरी गटांना बियाण्यांचे वितरण करण्यात आले असून, १,२८० हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड पूर्ण झाली आहे. जून महिन्यात, विशेषतः 23 व 24 जूनच्या सुमारास बियाण्यांचे वाटप करण्यात आले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून मार्गदर्शन –
कृषी विभाग या अभियानात फक्त बियाणे वाटपावर न थांबता संपूर्ण हंगामभर शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करणार आहे. आधुनिक शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, उत्पादन खर्च कमी करणे, रासायनिक खतांचा वापर नियंत्रित ठेवणे आणि उत्पादन वाढविणे, ही या अभियानाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष शेतभेट –
पहिल्या पावसानंतर कापसाची उगवण समाधानकारक झाल्याचे पाहण्यासाठी कृषी विभागाने प्रत्यक्ष शेतभेटी सुरू केल्या आहेत. जळगाव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, उपविभागीय कृषी अधिकारी किशोर मांडगे, तालुका कृषी अधिकारी सुधाकर कराड तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाचोरा तालुक्यातील लासगाव, खेडगाव तसेच तारखेडा येथे भेट देऊन लागवडीची पाहणी केली.

“कापूस उत्पादकता अभियानांतर्गत कमी अंतरावरील घनलागवडीला पाचोरा तालुक्यात शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. लासगाव, सामनेर, खेडगाव, तारखेडा आदी गावांमध्ये प्रत्यक्ष क्षेत्रभेटी घेऊन पिकांची पाहणी करण्यात आली आहे. या पद्धतीमुळे प्रति एकर झाडांची संख्या वाढून उत्पादनवाढीस मदत होण्याची अपेक्षा आहे. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना संपूर्ण हंगामात वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन, पिकांची पाहणी आणि योग्य व्यवस्थापनाबाबत सल्ला दिला जाणार आहे.”
– सुधाकर कराड (तालुका कृषी अधिकारी, पाचोरा)

यावेळी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत घनलागवडीमुळे उत्पादनात कशी वाढ होऊ शकते, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच सुरुवातीच्या टप्प्यात रासायनिक फवारण्यांऐवजी दोन फवारण्या लिंबोळी अर्काच्या आणि एक फवारणी दशपर्णी अर्काची करण्याचा सल्ला दिला. या भेटीत प्रगतिशील शेतकरी तसेच मंडळ कृषी अधिकारी आणि कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

बदलत्या शेतीकडे एक महत्त्वाचे पाऊल –
कापूस उत्पादन वाढविण्यासोबतच शाश्वत शेतीचा मार्ग स्वीकारण्यासाठी हे अभियान महत्त्वाचे ठरत आहे. कमी अंतरावरील घन लागवड, तांत्रिक मार्गदर्शन आणि नैसर्गिक उपायांवर भर या माध्यमातून कापूस शेती अधिक फायदेशीर करण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न असून आगामी काळात या अभियानाचे परिणाम उत्पादनाच्या आकडेवारीतही दिसून येतील, अशी अपेक्षा कृषी विभागाकडून तसेच शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

हेही वाचा: महावितरणच्या कारभारावर नागरिकांचा संताप; पाचोरा-भडगावातील आढावा बैठकीत प्रश्नांचा भडिमार

बातमी शेअर करा !
Share
Tags: agriculture departmentcotton cultivationcotton productivity campaignpachora newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

August 29, 2026
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

August 29, 2026
‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

August 29, 2026
‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

August 29, 2026
सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

August 29, 2026
कुंभमेळ्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

कुंभमेळ्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

August 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page