• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home बोदवड

बोदवड पंचायत समितीतील कनिष्ठ सहाय्यक 600 रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात, नेमकं प्रकरण काय?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 31, 2026
in बोदवड, क्राईम, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
बोदवड पंचायत समितीतील कनिष्ठ सहाय्यक 600 रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात, नेमकं प्रकरण काय?

जळगाव, 31 जुलै: बोदवड पंचायत समिती कार्यालयातील कनिष्ठ सहाय्यकाला वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजनेचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे पंचायत समिती परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपी उमेश शामकांत सपकाळे (वय ४९) हे पंचायत समिती कार्यालय, बोदवड येथे कनिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत.

नेमकं प्रकरण काय? –

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे वाद्य कलाकार असून त्यांनी शासनाच्या वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजनेचा लाभ मिळण्यासाठी ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाइन अर्ज केला होता. अर्जाची प्रत पुढील कार्यवाहीसाठी पंचायत समिती, बोदवड येथे जमा करण्यात आली होती. त्यानंतर अर्जाच्या स्थितीची चौकशी करण्यासाठी तक्रारदार पंचायत समिती कार्यालयात गेले असता, प्रस्ताव तयार करून तो जिल्हा परिषद, जळगाव येथे पाठविण्यासाठी कनिष्ठ सहाय्यक उमेश सपकाळे यांनी सुरुवातीला ३ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार तक्रारदारांनी ३० जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.

‘….अन् 600 रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात’ –

तक्रारीची पडताळणी करताना पंचांसमक्ष आरोपीने तडजोडीनंतर ६०० रुपयांची लाच स्वीकारण्यास तयारी दर्शविली. त्यानुसार ३० जुलै रोजी पंचायत समिती, बोदवड येथील सामान्य प्रशासन कक्षाबाहेरील गॅलरीमध्ये आरोपी उमेश सपकाळे यांनी पंचासमक्ष तक्रारदाराकडून ६०० रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारली. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई –

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या पर्यवेक्षणात तसेच जळगावच्या पोलीस निरीक्षक तथा सापळा अधिकारी स्मिता नवघरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार बाळू मराठे, पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाने आणि अमोल सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा: ZP CEO करिश्मा नायर यांचा अचानक दौरा अन् कार्यालयीन वेळेत ग्रामपंचायत कार्यालय बंद आढळलं; वाकोदमध्ये नेमकं काय घडलं?

बातमी शेअर करा !
Share
Tags: acb trapbodwad panchayat samitijalgoan acbjunior assistant bribe casemarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | “मला मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलाय, की……!”; अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुद्यावर आमदार किशोर आप्पा पाटील यांचा मोठा दावा

VIDEO | “मला मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलाय, की……!”; अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुद्यावर आमदार किशोर आप्पा पाटील यांचा मोठा दावा

July 31, 2026
बोदवड पंचायत समितीतील कनिष्ठ सहाय्यक 600 रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात, नेमकं प्रकरण काय?

बोदवड पंचायत समितीतील कनिष्ठ सहाय्यक 600 रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात, नेमकं प्रकरण काय?

July 31, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी तातडीने पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी तातडीने पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

July 31, 2026
पाचोरा-भडगाव मतदारसंघात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न; 5 हजारांहून अधिक लाभार्थ्यांना योजनांचा लाभ

पाचोरा-भडगाव मतदारसंघात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न; 5 हजारांहून अधिक लाभार्थ्यांना योजनांचा लाभ

July 30, 2026
ZP CEO करिश्मा नायर यांचा अचानक दौरा अन् कार्यालयीन वेळेत ग्रामपंचायत कार्यालय बंद आढळलं; वाकोदमध्ये नेमकं काय घडलं?

ZP CEO करिश्मा नायर यांचा अचानक दौरा अन् कार्यालयीन वेळेत ग्रामपंचायत कार्यालय बंद आढळलं; वाकोदमध्ये नेमकं काय घडलं?

July 30, 2026
लासगाव येथे कापूस उत्पादकता अभियानांतर्गत शेतकरी प्रशिक्षण; अति घन लागवडीचे मार्गदर्शन

लासगाव येथे कापूस उत्पादकता अभियानांतर्गत शेतकरी प्रशिक्षण; अति घन लागवडीचे मार्गदर्शन

July 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page