• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

लखपती दीदी अभियानाच्या वाढीव लक्षांकपूर्तीसाठी बचतगटांच्या व्यापक सहभागावर भर द्यावा – मंत्री जयकुमार गोरे

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 6, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
लखपती दीदी अभियानाच्या वाढीव लक्षांकपूर्तीसाठी बचतगटांच्या व्यापक सहभागावर भर द्यावा – मंत्री जयकुमार गोरे

मुंबई, दि. ५ : स्वयं सहाय्यता गटांमधील गरीब व गरजू महिलांना विविध उपजीविका उपक्रम, कौशल्य विकास, आर्थिक सक्षमीकरण आणि बाजारपेठेच्या संधी उपलब्ध करून देत त्यांना ‘लखपती दीदी’ बनविण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. राज्यात एक कोटी लखपती दीदी निर्माण करण्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी बचतगटांच्या व्यापक सहभागावर भर देण्यात यावा, अशा सूचना ग्राम विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या.

‘लखपती दीदी’ अभियानाच्या वाढीव लक्ष्यांकबाबत मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत ग्राम विकास मंत्री गोरे यांनी यंत्रणांना सूचित केले. बैठकीस ग्राम विकास सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, उमेद’ अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर डुबे पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

ग्राम विकास मंत्री गोरे यांनी सांगितले की, महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आणि ग्रामीण भागातील कुटुंबांचे उत्पन्न वाढविण्यासाठी ‘लखपती दीदी’ अभियान निश्चितच उपयोगी ठरणार आहे. त्यादृष्टीने याची अधिक व्यापक आणि प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे.  जिल्हानिहाय प्रगतीचा आढावा, महिला बचत गटांचे बळकटीकरण, नवीन महिलांचा समावेश, डिजिटल आजीविका नोंदणी, कौशल्य प्रशिक्षण तसेच उत्पन्नवाढीच्या विविध उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत ‌मंत्री गोरे यांनी संबंधितांना सूचना दिल्या.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत ‘महिला बचत गट नोंदणी मोहीम व १ कोटी लखपती दीदी संकल्प अभियान’ राबविण्याचा शासन निर्णय १७ जुलै २०२६ रोजी जारी केला आहे. २०२६ ते २०२९ या कालावधीत हे अभियान राज्यभर प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. या अभियानाद्वारे महिलांना केवळ बचत गटात सहभागी करून घेणे एवढ्यावर मर्यादित न राहता, विविध शासकीय योजनांचा कृतीसंगम साधून त्यांना कौशल्य विकास, वित्तीय सेवा तसेच त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे महिलांच्या उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक समृद्धीचा मार्ग मोकळा होणार आहे.

केंद्र शासनाच्या सहा कोटी लखपती दीदी निर्माण करण्याच्या प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील एक कोटी ग्रामीण महिलांना ‘लखपती दीदी’ बनविण्याचा संकल्प सिद्ध करण्यासाठीचे नियोजन, उद्दिष्टपूर्ती आणि आगामी कृती आराखड्यावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

तसेच राज्यात आतापर्यंत ५० लाख लखपती दीदी घडविण्यात यश मिळाल्याबद्दल या अभियानात सहभागी अधिकारी, कर्मचारी, जिल्हा यंत्रणा, स्वयं सहाय्यता गट, समुदाय संसाधन व्यक्ती आणि संबंधित घटकांचे अभिनंदन  करण्यात आले. वाढीव  उद्दिष्टही त्याच जोमाने आणि लोकसहभागातून पूर्ण करण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

हेही वाचा: महाराष्ट्रात बनावट पनीरविरोधात मोठी कारवाई; ‘अ‍ॅनालॉग पनीर’वर वर्षभर बंदी, अन्न व औषध प्रशासनाने (FDA) महत्त्वाचा निर्णय

बातमी शेअर करा !
Share
Tags: lakhpati didimarathi newsminister jaykumar goreself-help groupssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, 2026’ माहिती पुस्तिकेचे प्रकाशन

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, 2026’ माहिती पुस्तिकेचे प्रकाशन

August 6, 2026
एमपीएससीकडून राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

एमपीएससीकडून राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

August 6, 2026
लखपती दीदी अभियानाच्या वाढीव लक्षांकपूर्तीसाठी बचतगटांच्या व्यापक सहभागावर भर द्यावा – मंत्री जयकुमार गोरे

लखपती दीदी अभियानाच्या वाढीव लक्षांकपूर्तीसाठी बचतगटांच्या व्यापक सहभागावर भर द्यावा – मंत्री जयकुमार गोरे

August 6, 2026
महाराष्ट्रात बनावट पनीरविरोधात मोठी कारवाई; ‘अ‍ॅनालॉग पनीर’वर वर्षभर बंदी, अन्न व औषध प्रशासनाने (FDA) महत्त्वाचा निर्णय

महाराष्ट्रात बनावट पनीरविरोधात मोठी कारवाई; ‘अ‍ॅनालॉग पनीर’वर वर्षभर बंदी, अन्न व औषध प्रशासनाने (FDA) महत्त्वाचा निर्णय

August 5, 2026
जागतिक आदिवासी दिनानिमित्त विष्णापूरात शासकीय योजनांच्या लाभांचे थेट वितरण; महिला बचत गट तसेच रानभाज्या मेळाव्याचे आयोजन

जागतिक आदिवासी दिनानिमित्त विष्णापूरात शासकीय योजनांच्या लाभांचे थेट वितरण; महिला बचत गट तसेच रानभाज्या मेळाव्याचे आयोजन

August 5, 2026
Pachora News: सातगाव डोंगरीचे महसूल सेवक उमेश चव्हाण यांना ‘आदर्श महसूल सेवक’ पुरस्कार

Pachora News: सातगाव डोंगरीचे महसूल सेवक उमेश चव्हाण यांना ‘आदर्श महसूल सेवक’ पुरस्कार

August 4, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page