• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा जि.प. शाळा व वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्राला मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची अचानक भेट

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 7, 2026
in पाचोरा, ताज्या बातम्या
पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा जि.प. शाळा व वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्राला मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची अचानक भेट

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 7 ऑगस्ट: जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी गुरुवार, दि. 7 ऑगस्ट रोजी पाचोरा तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान गोराडखेडा जिल्हा परिषद शाळा तसेच वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट देऊन विविध कामांची पाहणी केली. यावेळी शिक्षण व आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या.

पाचोऱ्यात घरकूल योजनेसंदर्भात पंचायत समितीत बैठक –

दौऱ्याची सुरुवात पाचोरा पंचायत समिती येथे ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांच्या बैठकीने झाली. या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुलांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. अपूर्ण घरकुले, तसेच लाभार्थ्यांना पहिला व दुसरा हप्ता वितरित न झालेल्या प्रकरणांची तपशीलवार समीक्षा करून संबंधित अधिकाऱ्यांना प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे व अपूर्ण घरकुले लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी दिले.

गोराडखेडा जिल्हा परिषद शाळेला भेट –

त्यानंतर त्यांनी गोराडखेडा जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन शैक्षणिक उपक्रमांची पाहणी केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अध्ययनाचा आढावा घेतला. निपुण चाचणीसंदर्भात विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करून घेत त्यांच्या अध्ययन क्षमतेची पडताळणी केली. तसेच शाळेतील मध्यान्ह भोजनाची प्रत्यक्ष चव चाखून भोजनाच्या गुणवत्तेचीही पाहणी केली.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी अधिक प्रभावी अध्यापन पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन केले. तसेच शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी पालकांशी सातत्याने संवाद साधून शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच प्रवेशवाढीवरही विशेष भर देण्याच्या सूचना दिल्या.

वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट –

यानंतर वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन त्यांनी आरोग्य केंद्रातील स्वच्छतेची पाहणी केली. ओपीडी नोंदवही, औषध साठा, एक्सपायरी रजिस्टर यांची तपासणी करून उपलब्ध औषधसाठ्याची माहिती घेतली. नागरिकांना दर्जेदार व वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सतर्क राहून जबाबदारीने काम करावे, तसेच प्राथमिक आरोग्य सुविधा कोणत्याही परिस्थितीत बाधित होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी व पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा: जळगाव बायपास प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी; ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आदेश

बातमी शेअर करा !
Share
Tags: goradkheda zp schooljalgaon zp ceo karishma nairpachora newsphc varkhedisuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा जि.प. शाळा व वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्राला मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची अचानक भेट

पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा जि.प. शाळा व वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्राला मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची अचानक भेट

August 7, 2026
पवित्र पोर्टलद्वारे राज्यातील 30 हजारांहून अधिक शिक्षक पदांची भरती प्रक्रिया सुरू

पवित्र पोर्टलद्वारे राज्यातील 30 हजारांहून अधिक शिक्षक पदांची भरती प्रक्रिया सुरू

August 7, 2026
जळगाव बायपास प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी; ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आदेश

जळगाव बायपास प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी; ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आदेश

August 6, 2026
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, 2026’ माहिती पुस्तिकेचे प्रकाशन

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, 2026’ माहिती पुस्तिकेचे प्रकाशन

August 6, 2026
एमपीएससीकडून राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

एमपीएससीकडून राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

August 6, 2026
लखपती दीदी अभियानाच्या वाढीव लक्षांकपूर्तीसाठी बचतगटांच्या व्यापक सहभागावर भर द्यावा – मंत्री जयकुमार गोरे

लखपती दीदी अभियानाच्या वाढीव लक्षांकपूर्तीसाठी बचतगटांच्या व्यापक सहभागावर भर द्यावा – मंत्री जयकुमार गोरे

August 6, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page