• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव बायपास प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी; ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आदेश

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 6, 2026
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
जळगाव बायपास प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी; ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आदेश

जळगाव, 6 ऑगस्ट: धुळे–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील तरसोद बायपास परिसरातील असोदा येथील उड्डाणपूल खचल्याच्या गंभीर घटनेची केंद्रीय स्तरावर दखल घेत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून संबंधित ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट (काळ्या यादीत) टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दोषी अधिकारी व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

असोदा उड्डाणपूल खचल्याची घटना घडल्यानंतर खासदार स्मिता वाघ यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेत नागरिकांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन निकृष्ट दर्जाच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्यासह दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

दरम्यान, या दुर्घटनेनंतर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, आमदार राजूमामा भोळे, जळगावचे महापौर दीपमाला काळे तसेच जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली होती.

जळगाव बायपास प्रकरणात मोठी कारवाई –

जलसंपदा मंत्री मा गिरीशजी महाजन, खासदार वाघ यांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले. चौकशीत दोषी आढळणाऱ्या संबंधित ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचा निर्णय घेत संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

तसेच खासदार स्मिता वाघ यांनी जळगाव शहरातील वाढती वाहतूक कोंडी, वारंवार होणारे अपघात आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींचा मुद्दाही केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यासमोर प्रभावीपणे मांडला. शहरातील आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक, अजिंठा चौक तसेच नशिराबाद येथील महालक्ष्मी मंदिर मार्गावर उड्डाणपूल अथवा व्हेईक्युलर अंडरपास (VUP) उभारण्याची मागणी त्यांनी केली. या प्रस्तावांनाही केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

त्यामुळे जळगाव शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास, अपघातांना आळा बसण्यास आणि नागरिकांना सुरक्षित व सुकर प्रवासाची सुविधा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

“जळगाव शहराची वाढती लोकसंख्या आणि वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे ही काळाची गरज आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत दर्जेदार पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी माझा पाठपुरावा यापुढेही सातत्याने सुरू राहील.”

– स्मिता वाघ (खासदार, जळगाव लोकसभा )

हेही वाचा: महाराष्ट्रात बनावट पनीरविरोधात मोठी कारवाई; ‘अ‍ॅनालॉग पनीर’वर वर्षभर बंदी, अन्न व औषध प्रशासनाने (FDA) महत्त्वाचा निर्णय

बातमी शेअर करा !
Share
Tags: contractor blacklistedjalgaon bypass casejalgaon newssuvarna khandesh liveunion minister nitin gadkari

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपड्यातील गणेशोत्सवातील बंदोबस्ताबद्दल मुस्लिम बांधवांकडून पोलीस निरीक्षक पवन देसले यांचा सत्कार

चोपड्यातील गणेशोत्सवातील बंदोबस्ताबद्दल मुस्लिम बांधवांकडून पोलीस निरीक्षक पवन देसले यांचा सत्कार

September 23, 2026
जनगणना 2027 प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण सत्र; अचूक व प्रभावी अंमलबजावणीसाठी नव्या मॉडेलचा होणार वापर

जनगणना 2027 प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण सत्र; अचूक व प्रभावी अंमलबजावणीसाठी नव्या मॉडेलचा होणार वापर

September 23, 2026
माजी मंत्री बच्चू कडू उद्या पाचोऱ्यात; शिवसंवाद दौऱ्यानिमित्त शेतकरी, दिव्यांग व विविध सामाजिक घटकांशी साधणार संवाद

माजी मंत्री बच्चू कडू उद्या पाचोऱ्यात; शिवसंवाद दौऱ्यानिमित्त शेतकरी, दिव्यांग व विविध सामाजिक घटकांशी साधणार संवाद

September 23, 2026
पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सुमारे 45.49 कोटींचा वाढीव निधी; आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सुमारे 45.49 कोटींचा वाढीव निधी; आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

September 23, 2026
देशनिहाय स्किल पासपोर्ट, अद्ययावत प्रशिक्षण आणि सुरक्षित भरती प्रक्रियेवर राज्य शासनाचा भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

देशनिहाय स्किल पासपोर्ट, अद्ययावत प्रशिक्षण आणि सुरक्षित भरती प्रक्रियेवर राज्य शासनाचा भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 22, 2026
जळगाव जिल्ह्यात ‘स्पेलिंग बी’ उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या इंग्रजी सक्षमीकरणाला नवी दिशा; जिल्हास्तरीय स्पर्धेत चार गटांतील 120 विद्यार्थी सहभागी होणार

जळगाव जिल्ह्यात ‘स्पेलिंग बी’ उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या इंग्रजी सक्षमीकरणाला नवी दिशा; जिल्हास्तरीय स्पर्धेत चार गटांतील 120 विद्यार्थी सहभागी होणार

September 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page