• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

नशामुक्त युवा विकसित भारत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समन्वयाने काम करावे – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 7, 2026
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
नशामुक्त युवा विकसित भारत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समन्वयाने काम करावे – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

जळगाव, 7 ऑगस्ट: युवकांमधील वाढत्या व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी जिल्ह्यासाठी व्यापक कृती आराखडा तयार करण्यात येत असून, शाळा-महाविद्यालयांपासून गाव-वॉर्ड पातळीपर्यंत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यासाठी ‘माय भारत क्लब’, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था, ग्रामपंचायती, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग तसेच सामाजिक व आध्यात्मिक संस्थांनी सहभागी होऊन सर्वांनी  समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले.

‘नशामुक्त युवा विकसित भारत’ अभियान –

भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या ‘नशामुक्त युवा विकसित भारत’ या राष्ट्रव्यापी अभियानाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आज श्रीमती खडसे यांच्या अध्यक्षतेखाली दुरदृष्य प्रणालीद्वारे पूर्वतयारी संदर्भात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करीष्मा नायर, माय भारतचे जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चवरे आदींसह संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी ‘प्रोटेक्ट, प्रिव्हेंट, रिकव्हर’ या त्रिसूत्रीवर भर देण्यात येणार आहे. पालक संवाद, समुपदेशन, डिजिटल डिटॉक्स, करिअर मार्गदर्शन, क्रीडा, योग, पारंपरिक खेळ, वाचन चळवळ, कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन आदी उपक्रमांद्वारे युवकांना सकारात्मक पर्याय उपलब्ध करून दिले जातील.

दर महिन्याला चार रविवार विविध उपक्रमांसाठी निश्चित करण्याचा प्रस्ताव आहे. पहिल्या रविवारी तज्ज्ञ मार्गदर्शन व जीवनकौशल्य प्रशिक्षण, दुसऱ्या रविवारी क्रीडा, योग, सायकल रॅली, ट्रेकिंग व सांस्कृतिक कार्यक्रम, तिसऱ्या रविवारी स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, रक्तदान व सामाजिक उपक्रम, तर चौथ्या रविवारी युवक महोत्सव, स्पर्धा, पुरस्कार व कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व गावांपर्यंत हे अभियान पोहोचविण्याचे उद्दिष्ट असून, प्रत्येक गावात ‘माय भारत युवा क्लब’ स्थापन करण्यावर भर दिला जाणार आहे. व्यसनाच्या विळख्यात सापडलेल्या किंवा धोक्याच्या उंबरठ्यावर असलेल्या युवकांना कौशल्य विकास, रोजगार, समुपदेशन व पुनर्वसनाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणले जाईल.

जळगाव जिल्ह्यातील अमली पदार्थविरोधी कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. संशयित बंद कारखाने, कुरिअर व टपाल व्यवस्था, प्रवासी बस तसेच इतर ठिकाणी तपासणी केली जात असून, अमली पदार्थांच्या पुरवठा साखळीचा शेवटपर्यंत माग काढण्यावर पोलिसांचा भर आहे. ‘मिशन राईज’ उपक्रमातून शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्पपरिणामांबाबत जनजागृती केली जाणार आहे. या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी करावयाच्या आवश्यक कृतीचे सादरीकरण जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी यावेळी केले.

हेही वाचा: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कर्जमुक्ती योजनेतील पहिल्या टप्प्यात 6.22 लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये 5,028 कोटींची रक्कम जमा

बातमी शेअर करा !
Share
Tags: drug-free youth developed india campaignjalgaon newsmarathi newsmos raksha khadsesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांची जळगाव जिल्ह्यातील शाळांना भेट

शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल यांची जळगाव जिल्ह्यातील शाळांना भेट

August 7, 2026
नशामुक्त युवा विकसित भारत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समन्वयाने काम करावे – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

नशामुक्त युवा विकसित भारत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समन्वयाने काम करावे – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

August 7, 2026
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कर्जमुक्ती योजनेतील पहिल्या टप्प्यात 6.22 लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये 5,028 कोटींची रक्कम जमा

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कर्जमुक्ती योजनेतील पहिल्या टप्प्यात 6.22 लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये 5,028 कोटींची रक्कम जमा

August 7, 2026
पाचोरा-भडगावमध्ये सर्वपक्षीय आक्रमक; शासकीय कार्यक्रमांत विरोधी पक्षांना डावलल्याचा आरोप

पाचोरा-भडगावमध्ये सर्वपक्षीय आक्रमक; शासकीय कार्यक्रमांत विरोधी पक्षांना डावलल्याचा आरोप

August 7, 2026
पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा जि.प. शाळा व वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्राला मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची अचानक भेट

पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा जि.प. शाळा व वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्राला मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची अचानक भेट

August 7, 2026
पवित्र पोर्टलद्वारे राज्यातील 30 हजारांहून अधिक शिक्षक पदांची भरती प्रक्रिया सुरू

पवित्र पोर्टलद्वारे राज्यातील 30 हजारांहून अधिक शिक्षक पदांची भरती प्रक्रिया सुरू

August 7, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page