• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पारोळा

ग्रामसभेतील गदारोळानंतर ग्रामसेवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; पारोळा तालुक्यातील शिवरे येथील घटना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 18, 2026
in पारोळा, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
ग्रामसभेतील गदारोळानंतर ग्रामसेवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; पारोळा तालुक्यातील शिवरे येथील घटना

शिवरे (पारोळा), 18 ऑगस्ट: पारोळा तालुक्यातील शिवरे येथे ग्रामसभेदरम्यान झालेल्या गदारोळानंतर ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) प्रल्हाद नारायण पाटील यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ग्रामसभेत काही नागरिकांनी हुल्लडबाजी, शिवीगाळ आणि मारहाणीचा प्रयत्न केल्याने पाटील यांना तीव्र मानसिक धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. ही घटना 16 ऑगस्ट रोजी घडली. याप्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरा पाच जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

ग्रामसभेत सरपंच आणि ग्रामसेवकांना जाब विचारला –

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवरे येथे 16 ऑगस्ट रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेदरम्यान काही ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांनी सरपंच आणि ग्रामसेवक पी. एन. पाटील यांना जाब विचारत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. तसेच पाटील यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे पाटील प्रचंड घाबरले. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी ग्रामसभा अर्धवट सोडून उपचारासाठी पारोळा येथील सिव्हिल रुग्णालय गाठण्याचा निर्णय घेतला.

रुग्णालयाकडे जात असताना पाठलागाचा आरोप –

तब्येत बिघडल्याने पाटील स्वतःच्या दुचाकीवरून रुग्णालयाकडे निघाले. मात्र, काही तरुणांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे पाटील यांना आणखी मोठा मानसिक धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

ग्रामसेवक संघटनेचे ठिय्या आंदोलन –

पी.एन. पाटील यांच्या मृत्यूची माहिती मिळताच ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. पारोळ्यासह जळगाव, अमळनेर, भडगाव आणि पाचोरा येथील ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेत ठिय्या आंदोलन केले.

ग्रामसभेतील मोबाईल व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेज तपासून दोषींवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनाला करणी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही पाठिंबा दिला. दोषींवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

सात जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा –

आंदोलनानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. ग्रामसभेतील गोंधळ आणि त्यानंतर झालेल्या कथित पाठलागाच्या पार्श्वभूमीवर सात संशयितांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पारोळा तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा: VIDEO | “दर्शन घेतानाच मला कानामध्ये…..!” नाशिकचे पालकमंत्री झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया

बातमी शेअर करा !
Share
Tags: gram sevakgram sevak death casegramsabhamarathi newsparola gramsevak newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

SIRची पडताळणी सुरू; Unmapped व विसंगती असलेल्या मतदारांच्या घरी BLO-AERO पथक जाणार, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

SIRची पडताळणी सुरू; Unmapped व विसंगती असलेल्या मतदारांच्या घरी BLO-AERO पथक जाणार, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

October 3, 2026
दिवेआगर दुर्घटना प्रकरण; आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

दिवेआगर दुर्घटना प्रकरण; आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

October 2, 2026
आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

October 2, 2026
पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द ग्रामपंचायतीच्या विकासकामांची चौकशी होणार; प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे

पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द ग्रामपंचायतीच्या विकासकामांची चौकशी होणार; प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे

October 2, 2026
‘ज्येष्ठ नागरिक ही देशाची संपत्ती!’; समाज कल्याण विभागाच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात संपन्न

‘ज्येष्ठ नागरिक ही देशाची संपत्ती!’; समाज कल्याण विभागाच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात संपन्न

October 2, 2026
दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर

दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर

October 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page