• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

VIDEO | “दर्शन घेतानाच मला कानामध्ये…..!” नाशिकचे पालकमंत्री झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 17, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, व्हिडीओ
VIDEO | “दर्शन घेतानाच मला कानामध्ये…..!” नाशिकचे पालकमंत्री झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया

पंढरपूर (सोलापूर), 17 ऑगस्ट: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला आहे. नाशिकच्या पालकमंत्रिपदी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांची, तर रायगडच्या पालकमंत्रिपदी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदासाठी महायुतीतील घटक पक्षांकडून सुरू असलेल्या रस्सीखेचीवर अखेर पडदा पडला आहे.

नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन –

नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठीही महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून दावे करण्यात आले होते. मात्र, अखेर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकची जबाबदारी देण्यात आली आहे. पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर महाजन यांनी पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर आनंद व्यक्त केला.

मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया –

“पंढरपुरात आल्यानंतर देवाचे दर्शन घेत असताना ही बातमी समजली. त्यामुळे मला पांडुरंग पावला आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानतो,” अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली. नाशिकमधील रस्त्यांच्या प्रश्नावरही त्यांनी भाष्य केले. नाशिकमधील रस्ते सिमेंटचे करण्याचे नियोजन असून, त्यासाठी नागरिकांना काही काळ त्रास सहन करावा लागेल; मात्र त्यानंतर नाशिक स्वच्छ आणि सुंदर होईल, असे महाजन यांनी सांगितले. यापूर्वी आपण कुंभमेळा मंत्री होतो आणि आता नाशिकचे पालकमंत्री झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

रायगडची जबाबदारी भरत गोगावले यांच्याकडे –

रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आदिती तटकरे इच्छुक होत्या. तर शिवसेना शिंदे गटाकडून भरत गोगावले यांनी या पदावर दावा केला होता. गेल्या काही दिवसांपासून याबाबत राजकीय चर्चा सुरू होती. अखेर रायगडची जबाबदारी भरत गोगावले यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच रायगडचे पालकमंत्री आपणच होणार असल्याचे संकेत गोगावले यांनी दिले होते. त्यांचे हे भाकीत अखेर खरे ठरले आहे.

हेही वाचा: स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन सक्षम व विकसित राष्ट्र घडविण्याचा संकल्प आवश्यक – आमदार किशोर आप्पा पाटील

बातमी शेअर करा !
Share
Tags: bharat gogawalegirish mahajanmarathi newsnashik guardian ministersuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

SIRची पडताळणी सुरू; Unmapped व विसंगती असलेल्या मतदारांच्या घरी BLO-AERO पथक जाणार, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

SIRची पडताळणी सुरू; Unmapped व विसंगती असलेल्या मतदारांच्या घरी BLO-AERO पथक जाणार, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

October 3, 2026
दिवेआगर दुर्घटना प्रकरण; आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

दिवेआगर दुर्घटना प्रकरण; आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

October 2, 2026
आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

October 2, 2026
पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द ग्रामपंचायतीच्या विकासकामांची चौकशी होणार; प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे

पाचोरा तालुक्यातील सारोळा खुर्द ग्रामपंचायतीच्या विकासकामांची चौकशी होणार; प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे

October 2, 2026
‘ज्येष्ठ नागरिक ही देशाची संपत्ती!’; समाज कल्याण विभागाच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात संपन्न

‘ज्येष्ठ नागरिक ही देशाची संपत्ती!’; समाज कल्याण विभागाच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात संपन्न

October 2, 2026
दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर

दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर

October 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page