• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

‘खेलो इंडिया संवाद  – खेल की बात PM के साथ’ उपक्रमात जळगावच्या युवकांचा उत्स्फूर्त सहभाग

युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ आवश्यक : रक्षा खडसे

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 28, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
‘खेलो इंडिया संवाद  – खेल की बात PM के साथ’ उपक्रमात जळगावच्या युवकांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव, 28 ऑगस्ट: राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘खेलो इंडिया संवाद-खेल की बात PM के साथ’ या विशेष राष्ट्रव्यापी उपक्रमाचे आयोजन भुसावळ येथील ‘श्री संत गाडगे बाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमास केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांची  विशेष उपस्थिती होती.

खेळामुळे मानसिक व शारीरिक आरोग्य चांगले राहते, ताणतणाव दूर होतो आणि एकाग्रता वाढते. बदलत्या जीवनशैलीमुळे युवकांना मिळणारा कौटुंबिक आधार कमी होत असताना, नैराश्यापासून दूर राहण्यासाठी आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी खेळांचे महत्त्व अधिक वाढले आहे. केवळ शिक्षणच नव्हे, तर तंदुरुस्त राहण्यासाठी प्रत्येकाने दररोज काही वेळ खेळासाठी दिला पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभासी संवाद हे होते. दिल्ली येथील मुख्य कार्यक्रमातून पंतप्रधानांनी देशातील युवकांशी दूरदष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. देशभरातील सुमारे १ हजार ६०० ठिकाणांहून ८ लाखांहून अधिक युवक या उपक्रमाशी जोडले गेले होते.

यावेळी श्रीमती खडसे यांच्या हस्ते विविध क्रीडा प्रकारांतून राज्य व राष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंचा पुष्पगुच्छ व पदक देऊन सन्मान करण्यात आला. क्रिडापटू सृष्टी साठे, दिशा पाटील आणि ज्ञानदा जामदार यांचीही यावेळी  उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्राचार्य डॉ.राहुल बी. बारजीभे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कमलेश सोनवणे यांनी केले. यावेळी जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चवरे, MY Bharat स्वयंसेवक, खेळाडू, विद्यार्थी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना नशामुक्त भारत अभियानाची शपथ देण्यात आली.

येथील डॉ.अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात “खेलो इंडिया संवाद: खेल की बात पी एम के साथ” या कार्यक्रमात आज महाविद्यालयातील ४०० खेळाडू व विद्यार्थिनींनी  उस्फुर्त सहभाग घेतला.

याप्रसंगी जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई वाघ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते बास्केटबॉल व व्हॉलीबॉल स्पर्धांचे उद्घाटन तसेच बुद्धिबळ व स्केटिंग या खेळाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. खासदार श्रीमती वाघ यांच्याहस्ते महाविद्यालयाची सॉफ्टबॉल खेळाडू नेहा देशमुख, गोल्ड मेडल मिळवणारी भावना कोळी, खेलो इंडिया प्रतिनिधी दिपाली सोनी व छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार विजेते  किशोर चौधरी यांना सन्मानित करण्यात आले.

हेही वाचा: पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीच्या माध्यमातून 13 हजार 119 पदांसाठी उमेदवारांची शिफारस; निवड झालेल्या उमेदवारांचे मंत्री दादाजी भुसे यांनी केले अभिनंदन

बातमी शेअर करा !
Share
Tags: khelo india samvadkhelo india samvad khel ki baat pm ke saathmarathi newsmos raksha khadsesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘खेलो इंडिया संवाद  – खेल की बात PM के साथ’ उपक्रमात जळगावच्या युवकांचा उत्स्फूर्त सहभाग

‘खेलो इंडिया संवाद  – खेल की बात PM के साथ’ उपक्रमात जळगावच्या युवकांचा उत्स्फूर्त सहभाग

August 28, 2026
पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथे नशामुक्तीची विद्यार्थ्यांनी घेतली सामूहिक प्रतिज्ञा

पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथे नशामुक्तीची विद्यार्थ्यांनी घेतली सामूहिक प्रतिज्ञा

August 28, 2026
पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीच्या माध्यमातून 13 हजार 119 पदांसाठी उमेदवारांची शिफारस; निवड झालेल्या उमेदवारांचे मंत्री दादाजी भुसे यांनी केले अभिनंदन

पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीच्या माध्यमातून 13 हजार 119 पदांसाठी उमेदवारांची शिफारस; निवड झालेल्या उमेदवारांचे मंत्री दादाजी भुसे यांनी केले अभिनंदन

August 28, 2026
लासगाव ग्रामसभेत सोलर प्रकल्पासह विविध मुद्द्यांवर ग्रामस्थ आक्रमक; चार तासांहून अधिक काळ चालली ग्रामसभा

लासगाव ग्रामसभेत सोलर प्रकल्पासह विविध मुद्द्यांवर ग्रामस्थ आक्रमक; चार तासांहून अधिक काळ चालली ग्रामसभा

August 27, 2026
जळगाव जिल्ह्यासाठी ‘डी प्लस’ औद्योगिक धोरणाचा प्रस्ताव तातडीने पुढील मंजुरीसाठी सादर करा; उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सूचना

जळगाव जिल्ह्यासाठी ‘डी प्लस’ औद्योगिक धोरणाचा प्रस्ताव तातडीने पुढील मंजुरीसाठी सादर करा; उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सूचना

August 26, 2026
शेतीच्या उत्पादन वाढीसाठी डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतीच्या उत्पादन वाढीसाठी डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 23, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page