• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

शासकीय बैठका, कार्यक्रमांत आरोग्यदायी मेनू बंधनकारक; मंत्रीमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय

तेलकट पदार्थांना आळा; फळे, पोहे, इडली-सांबार, कडधान्ये, ताक, पालेभाज्यांना प्राधान्य

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 2, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
शासकीय बैठका, कार्यक्रमांत आरोग्यदायी मेनू बंधनकारक; मंत्रीमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय

मुंबई, 2 सप्टेंबर: शासकीय व निमशासकीय बैठका, शासकीय कार्यक्रम, प्रशिक्षण, परिषदा तसेच शासकीय उपहारगृहांमध्ये आरोग्यदायी अल्पोपहार आणि संतुलित भोजन उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना बैठका, कार्यक्रम आणि प्रशिक्षणाच्या वेळी संतुलित व पौष्टिक आहार मिळावा, तसेच आरोग्यदायी जीवनशैलीची सवय लागावी, या उद्देशाने सर्व विभागांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत.

बैठका, कार्यक्रम, प्रशिक्षण संस्था, परिषदा आणि उपहारगृहांमध्ये अल्पोपहार किंवा भोजन देताना हंगामी फळे, उकडलेली अंडी, उकडलेले कडधान्य, पोहे, इडली-सांबार, गरम दूध, साखरविरहित ग्रीन टी, नाचणीची भाकरी, ज्वारी-बाजरीची भाकरी, ताक, कोशिंबीर, विविध भाज्या, डाळी व उसळी यांसारख्या पौष्टिक पदार्थांना प्राधान्य दिले जाणार आहे.

अल्पोपहारातील तेलकट आणि अति-प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांचे प्रमाण कमी करून स्थानिक व पारंपरिक पौष्टिक पदार्थांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. तर जेवणामध्ये डाळ, उसळ, पालेभाज्या, ताक, कोशिंबीर, भाजी आणि संतुलित धान्यांचा समावेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

संबंधित कार्यालयांच्या नवीन खानपान करारांमध्ये आरोग्यदायी मेनूचा समावेश करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी शासकीय व निमशासकीय संस्थांनी कर्मचाऱ्यांशी आरोग्यविषयक भूमिकेबाबत चर्चा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्यदायी जीवनशैली आणि पौष्टिक आहाराबाबत जनजागृती करण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश देण्यात येणार आहेत. मेनू निश्चित करताना आयसीएमआर-एनआयएनच्या मार्गदर्शक तत्त्वांचा आधार घेता येणार आहे.

दरम्यान, मंत्रालयातील उपहारगृहात फळे, उकडलेली अंडी, उकडलेले कडधान्य, पोहे, इडली-सांबार, गरम दूध आणि ग्रीन टी यांसारखे आरोग्यदायी पदार्थ उपलब्ध करून देण्यास सुरुवात झाली आहे. जेवणामध्येही डाळ, उसळ, पालेभाजी, ताक, कोशिंबीर आणि पुलाव यांसारख्या पौष्टिक पदार्थांचा समावेश करण्यात येत आहे.

हेही वाचा: सुट्टे खाद्यतेल व्यावसायिकांना कायद्यानुरूप बदलांसाठी एक वर्षाची मुदत — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बातमी शेअर करा !
Share
Tags: cabinet meetingeventsgovernment meetingshealthy menumahayuti governmentmarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Jalgaon News: जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

Jalgaon News: जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

September 2, 2026
रेशीम शेतीची संपूर्ण मूल्यसाखळी गावपातळीवर उभारणार; मंत्री संजय सावकारे यांची माहिती

रेशीम शेतीची संपूर्ण मूल्यसाखळी गावपातळीवर उभारणार; मंत्री संजय सावकारे यांची माहिती

September 2, 2026
2029 चे लक्ष्य अन् नशामुक्त महाराष्ट्रासाठी सरकारचा अ‍ॅक्शन प्लॅन; शाळेपासून मंत्रालयापर्यंत ‘ड्रग्ज’विरोधी मोहीम

2029 चे लक्ष्य अन् नशामुक्त महाराष्ट्रासाठी सरकारचा अ‍ॅक्शन प्लॅन; शाळेपासून मंत्रालयापर्यंत ‘ड्रग्ज’विरोधी मोहीम

September 2, 2026
शासकीय बैठका, कार्यक्रमांत आरोग्यदायी मेनू बंधनकारक; मंत्रीमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय

शासकीय बैठका, कार्यक्रमांत आरोग्यदायी मेनू बंधनकारक; मंत्रीमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय

September 2, 2026
सुट्टे खाद्यतेल व्यावसायिकांना कायद्यानुरूप बदलांसाठी एक वर्षाची मुदत — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सुट्टे खाद्यतेल व्यावसायिकांना कायद्यानुरूप बदलांसाठी एक वर्षाची मुदत — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 2, 2026
वरसाडे तांडा येथे आश्रमशाळेच्या नवीन इमारतीची पायाभरणी; आमदार किशोर आप्पा पाटील व भाजपचे मधू काटे यांच्या हस्ते भूमिपूजन

वरसाडे तांडा येथे आश्रमशाळेच्या नवीन इमारतीची पायाभरणी; आमदार किशोर आप्पा पाटील व भाजपचे मधू काटे यांच्या हस्ते भूमिपूजन

September 1, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page