• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

“सत्ता महत्त्वाची असली तरी त्यापेक्षा सत्य महत्त्वाचं; शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्षाची भूमिका कायम!” – आमदार बच्चू कडू

पाचोऱ्यात शिवसंवाद दौऱ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बच्चू कडूंनी व्यक्त केली भूमिका

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 24, 2026
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, पाचोरा, महाराष्ट्र
“सत्ता महत्त्वाची असली तरी त्यापेक्षा सत्य महत्त्वाचं; शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्षाची भूमिका कायम!” – आमदार बच्चू कडू

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

पाचोरा, 24 सप्टेंबर: सत्ता कोणाचीही असो, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठविणे हेच शिवसेनेचे कर्तव्य आहे. आज शेती ही केवळ कष्टाची राहिलेली नसून संकटाची झाली आहे. कमी पाऊस, अतिवृष्टी, वन्यप्राण्यांकडून होणारे नुकसान, वाढता मजुरी खर्च, पिकांना मिळणारा अपुरा भाव आणि बाजारपेठेतील अडचणी यामुळे शेतकरी अनेक संकटांचा सामना करीत आहे. असे असताना सत्ता मिळाली म्हणून शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर भूमिका घेणे थांबवता कामा नये. सत्ता महत्त्वाची असली तरी त्यापेक्षा सत्य महत्त्वाचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सत्तेत असतानाही संघर्ष करण्याची भूमिका कायम ठेवावी लागेल, असे माजी मंत्री तथा विधानपरिषद सदस्य बच्चू कडू यांनी सांगितले. पाचोरा येथे समर्थ लॉन्समध्ये आयोजित शिवसंवाद दौऱ्याच्या कार्यक्रमात आज दुपारी ते बोलत होते.

‘शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळणे आवश्यक’ –

शेतकऱ्यांना केवळ कर्जमाफी नव्हे, तर त्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळणे आवश्यक आहे. हमीभाव जाहीर केला जातो; मात्र प्रत्यक्षात अनेकदा शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे शेतमालाला योग्य भाव मिळावा किंवा उत्पादनासाठी लागणारा मजुरीचा खर्च ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेतून शासनाने भरून काढावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. कापूस, सोयाबीन आणि तूर उत्पादकांसाठीही या प्रश्नावर व्यापक लढा उभारण्याची गरज असल्याचे कडू यांनी सांगितले.

‘पुढील पाच वर्षांत शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहील’ –

सामान्य माणसांच्या प्रश्नांकडे लक्ष देणारे आणि कार्यकर्त्यांना सहज उपलब्ध होणारे नेतृत्व म्हणून बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख केला. रात्री उशिराही सामान्य नागरिकांना भेटण्यासाठी वर्षा निवासस्थानी मोठ्या संख्येने लोक उपस्थित असल्याचा अनुभव त्यांनी सांगितला. तसेच, आपल्या मागणीवरून राज्यातील पहिले दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यास शिंदे यांनी सहकार्य केल्याचेही कडू यांनी नमूद केले. दरम्यान, “येणाऱ्या पाच वर्षांत शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहणार,” असे वक्तव्य कडू यांनी केले.

तसेच येत्या काळात सरकारमध्ये खांदेपालट होण्याची शक्यता आहे. यामुळे आगामी काळात किशोर आप्पांना मंत्रिपदाची संधी मिळावी यासाठी त्यांच्या नावाची शिफारस केल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.

बच्चू कडूंनी केलं आमदार किशोर आप्पा पाटील यांचं कौतुक –

यावेळी बच्चू कडू यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या कामाचे कौतुक केले. पाचोरा-भडगाव मतदारसंघातील जनतेने सलग तीन वेळा किशोर आप्पांना विधानसभेत पाठविले असून, त्यांच्या माध्यमातून मतदारसंघातील विविध संस्थांमध्ये शिवसेनेची ताकद निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले. सामान्य कार्यकर्त्यांशी असलेला जिव्हाळा आणि सातत्याने काम करण्याची भूमिका ही त्यांच्या नेतृत्वाची वैशिष्ट्ये असल्याचेही कडू यांनी सांगितले.

किशोर आप्पा पाटील आणि कार्यकर्त्यांचे नाते हे केवळ पक्षापुरते मर्यादित नसून परिवारासारखे असल्याचेही बच्चू कडू यांनी नमूद केले. जात, पैसा किंवा पदाच्या अडचणी असूनही प्रामाणिक कार्यकर्ता पक्ष आणि नेतृत्वाच्या पाठीशी उभा राहतो. अशा कार्यकर्त्यांच्या मेहनतीतून नेतृत्व घडत असते. त्यामुळे पाचोरा-भडगाव मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी एकजूट आणि आत्मविश्वास कायम ठेवून काम केल्यास किशोर आप्पा पाटील यांचे नेतृत्व अधिक मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अमरावतीत आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे संघटन मजबूत होत असून, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचा विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘शेतकऱ्यांच्या हितासाठी सत्तेपेक्षा विचार महत्त्वाचा’ –

शेतकऱ्यांच्या हितासाठी सत्तेपेक्षा विचार महत्त्वाचा असल्याचे सांगत कडू म्हणाले की, शेतकऱ्याच्या खिशात पैसा गेला पाहिजे, हीच लढाई पुढे नेण्याची गरज आहे. पाचोरा-भडगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी सुमारे ४६ कोटी रुपयांची मदत मिळवून देण्यासाठी आमदार किशोर पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याचाही त्यांनी उल्लेख केला. संकटाच्या काळात शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

बच्चू कडू यांचे कार्यकर्त्यांना आवाहन –

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा उल्लेख करताना बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांना डोळ्यात तेल घालून काम करण्याचे आवाहन केले. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करणे गरजेचे आहे. नेतृत्व मतदारसंघाबाहेर असताना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होणारी सुस्ती पक्षासाठी अडचणीची ठरू शकते. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने आपली जबाबदारी स्वीकारून संघटन मजबूत करण्यासाठी सक्रिय राहावे, असे त्यांनी सांगितले.

बच्चू कडू यांच्या शिवसंवाद दौऱ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार किशोर आप्पा पाटील यांच्यासह पाचोरा-भडगाव तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी-कार्यकर्ते, प्रहार पक्षाचे पदाधिकारी-कार्यकर्ते तसेच शेतकरी आणि अपंग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, अरुण पाटील, प्रा.डॉ. अस्मिता पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण ब्राम्हणे यांनी केले.

हेही वाचा:  जळगावात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई! महसूल सहायकासह खासगी वकील 25 हजारांची लाच घेताना जाळ्यात

बातमी शेअर करा !
Share
Tags: bachchu kadumla kishor appa patilpachora newsshiv sanvad daurasuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा-भडगाव मतदारसंघ दुष्काळी जाहीर करण्यासाठी प्रयत्न करणार: आमदार किशोर आप्पा पाटील

पाचोरा-भडगाव मतदारसंघ दुष्काळी जाहीर करण्यासाठी प्रयत्न करणार: आमदार किशोर आप्पा पाटील

September 24, 2026
“सत्ता महत्त्वाची असली तरी त्यापेक्षा सत्य महत्त्वाचं; शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्षाची भूमिका कायम!” – आमदार बच्चू कडू

“सत्ता महत्त्वाची असली तरी त्यापेक्षा सत्य महत्त्वाचं; शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्षाची भूमिका कायम!” – आमदार बच्चू कडू

September 24, 2026
चोपड्यातील गणेशोत्सवातील बंदोबस्ताबद्दल मुस्लिम बांधवांकडून पोलीस निरीक्षक पवन देसले यांचा सत्कार

चोपड्यातील गणेशोत्सवातील बंदोबस्ताबद्दल मुस्लिम बांधवांकडून पोलीस निरीक्षक पवन देसले यांचा सत्कार

September 23, 2026
जनगणना 2027 प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण सत्र; अचूक व प्रभावी अंमलबजावणीसाठी नव्या मॉडेलचा होणार वापर

जनगणना 2027 प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण सत्र; अचूक व प्रभावी अंमलबजावणीसाठी नव्या मॉडेलचा होणार वापर

September 23, 2026
माजी मंत्री बच्चू कडू उद्या पाचोऱ्यात; शिवसंवाद दौऱ्यानिमित्त शेतकरी, दिव्यांग व विविध सामाजिक घटकांशी साधणार संवाद

माजी मंत्री बच्चू कडू उद्या पाचोऱ्यात; शिवसंवाद दौऱ्यानिमित्त शेतकरी, दिव्यांग व विविध सामाजिक घटकांशी साधणार संवाद

September 23, 2026
पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सुमारे 45.49 कोटींचा वाढीव निधी; आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सुमारे 45.49 कोटींचा वाढीव निधी; आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

September 23, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page