• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावात कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न; गिरणा प्रकल्पातून आवर्तन सोडण्यासंदर्भात पालकमंत्र्यांचे महत्वाचे निर्देश

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 6, 2026
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
जळगावात कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न; गिरणा प्रकल्पातून आवर्तन सोडण्यासंदर्भात पालकमंत्र्यांचे महत्वाचे निर्देश

जळगाव, 6 नोव्हेंबर: जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देतानाच शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याचा आवश्यक साठा सुरक्षित ठेवून गिरणा प्रकल्पातून पिण्याच्या पाण्यासाठी व औद्योगिक वापरासाठी तीन बिगरसिंचन आवर्तने, तर शेतकऱ्यांच्या हितासाठी एक सिंचन आवर्तन सोडण्याचे नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न –

जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांच्या पाणी नियोजनासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती कक्षात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत गिरणा प्रकल्पासह जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचा उपलब्ध पाणीसाठा, पिण्याच्या पाण्याचे आरक्षण, औद्योगिक गरजा, सिंचनाचे नियोजन आणि कालव्यांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

पालकमंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले? –

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, दुष्काळाच्या काळात उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. नागरिकांना पाणीटंचाई भासू नये आणि शेतकऱ्यांच्या पिकांनाही आवश्यक सिंचनाचा आधार मिळावा, यासाठी दूरदृष्टीने नियोजन करणे गरजेचे आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देतानाच शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष होता कामा नये. त्यासाठी तीन बिगरसिंचन व एक सिंचन आवर्तनाचे नियोजन करून जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाने समन्वयाने कार्यवाही करावी. उपलब्ध जलसाठ्याचा काटेकोर वापर करून पाण्याची नासाडी रोखण्यावर विशेष भर द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले.

भविष्यातील पाणीटंचाईचा वेध घेऊन काटेकोर नियोजन करा — जलसंपदामंत्री गिरीश महाजन
जलसंपदामंत्री गिरीश महाजन म्हणाले की, केवळ सध्याची पाण्याची उपलब्धता पाहून निर्णय न घेता आगामी उन्हाळ्यात उद्भवू शकणाऱ्या पाणीटंचाईचा विचार करून आतापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे. पिण्याचे पाणी, शेती आणि औद्योगिक गरजा यांचा समतोल राखून उपलब्ध जलसाठ्याचे योग्य वितरण करावे. संभाव्य टंचाईग्रस्त भागांचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना हाती घ्याव्यात. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रभावी नियंत्रण ठेवावे. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घेऊन सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

गिरणा कालव्यावरील सर्व पाटचाऱ्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य
गिरणा कालव्याच्या माध्यमातून अधिकाधिक शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळण्यासाठी पाणी वितरण व्यवस्था सक्षम करणे आवश्यक असल्याचे सांगत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कालव्यावरील सर्व पाटचाऱ्या व वितरिकांची पाहणी करून आवश्यक दुरुस्तीचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश दिले. पाण्याची गळती व नासाडी रोखून शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचले पाहिजे. सिंचन व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी सुरू असलेली कामे दर्जेदार व निर्धारित मुदतीत पूर्ण करावीत. जिल्हाधिकारी व संबंधित अभियंत्यांनी कामांची नियमित पाहणी करून गुणवत्तेवर नियंत्रण ठेवावे. कामात विनाकारण विलंब किंवा त्रुटी आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी, असे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले.

दीपनगर पाइपलाइनचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करा – मंत्री संजय सावकारे
ओझर-टाकरखेडा ते दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रापर्यंतच्या पाइपलाइनचे सुमारे तीन किलोमीटरचे काम अद्याप अपूर्ण असून, ते तातडीने पूर्ण करण्याची मागणी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी बैठकीत केली. त्यावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित यंत्रणेला तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले. तसेच धरणातून आवर्तनाचे पाणी नदीपात्रात सोडल्यानंतर केटी वेअरमधून होणारी गळती रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी सूचनाही मंत्री सावकारे यांनी केली.

बैठकीत लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता संतोष भोसले यांनी पाणी नियोजनाबाबत सविस्तर सादरीकरण केले. तर जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता गोकुळ महाजन यांनी जिल्ह्यातील उर्वरित प्रकल्पांची सद्यस्थिती व त्यासंबंधीची सविस्तर माहिती दिली.

या बैठकीस आमदार नंदकिशोर महाजन,आमदार अमोल पाटील, आमदार किशोर पाटील, धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, जळगाव महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता तथा प्रशासक संतोष भोसले, जळगाव, गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पाटील, पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता आदिती कुलकर्णी, उत्तम दाभाळे, सहाय्यक अभियंता वैष्णवी तोडकरी, उपविभागीय अधिकारी सुभाष चव्हाण, विजय जाधव, के. आर. पाटील, एस. जी. चौधरी, पी. एम. पाटील, अशासकीय सदस्य प्रशांत पवार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा: एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्डची सक्ती तूर्तास शिथिल; 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

बातमी शेअर करा !
Share
Tags: canal advisory committeegirna projectjalgaon newsminister gulabrao patilsuvarna khandesh livewater rotation

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न; गिरणा प्रकल्पातून आवर्तन सोडण्यासंदर्भात पालकमंत्र्यांचे महत्वाचे निर्देश

जळगावात कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न; गिरणा प्रकल्पातून आवर्तन सोडण्यासंदर्भात पालकमंत्र्यांचे महत्वाचे निर्देश

November 6, 2026
Pachora News: पाचोरा तालुक्यातील 48 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपयांची मदत जमा होण्यास सुरुवात; काँग्रेसचे आंदोलन स्थगित

Pachora News: पाचोरा तालुक्यातील 48 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपयांची मदत जमा होण्यास सुरुवात; काँग्रेसचे आंदोलन स्थगित

November 6, 2026
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेत्र विभागातील अत्याधुनिक युनिट्ससह बाल अतिदक्षता विभागाचे उद्घाटन

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेत्र विभागातील अत्याधुनिक युनिट्ससह बाल अतिदक्षता विभागाचे उद्घाटन

November 6, 2026
एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्डची सक्ती तूर्तास शिथिल; 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्डची सक्ती तूर्तास शिथिल; 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

November 6, 2026
शेतकरी बांधवांसोबत दिवाळी साजरी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्र्यांना आवाहन

शेतकरी बांधवांसोबत दिवाळी साजरी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्र्यांना आवाहन

November 5, 2026
ट्रॅक्टरच्या हेडलाईटच्या उजेडात अंत्यसंस्कार, लासगावातील धक्कादायक वास्तव समोर

ट्रॅक्टरच्या हेडलाईटच्या उजेडात अंत्यसंस्कार, लासगावातील धक्कादायक वास्तव समोर

November 4, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page