• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा’; राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 4, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा’; राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात

मुंबई, 4 ऑक्टोबर: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेसह निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततेच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत ‘गर्जना मोर्चा’ काढण्यात आला. मेट्रो सिनेमा परिसरातून सुरू झालेला हा मोर्चा मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत काढण्यात आला. मोर्चाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही मोर्चाला उपस्थित राहून ठाकरे बंधूंच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

मोर्चानंतर राज ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित करत केंद्र सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. देशातील महत्त्वाची संसाधने, प्रकल्प आणि बंदरे मोजक्या उद्योगपतींच्या हातात दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसच्या काळात अनेक उद्योगपती होते; मात्र सध्याच्या सरकारच्या काळात एका उद्योगपतीला विशेष लाभ मिळत असल्याची टीका त्यांनी केली.

देशातील घटनात्मक संस्थांच्या स्वायत्ततेवरही राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग यांसारख्या संस्थांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत, देशाच्या लोकशाही व्यवस्थेच्या रचनेत बदल करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. या पार्श्वभूमीवरच हा मोर्चा काढण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

SIR प्रक्रियेवरही राज ठाकरेंचा सवाल –

विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIR प्रक्रियेच्या मुद्द्यावर बोलताना राज ठाकरे यांनी मतदार यादीतील बदलांवर आक्षेप घेतला. विधानसभा निवडणुकीच्या काळात मतदारसंख्या वाढवायची आणि त्यानंतर SIRच्या माध्यमातून मोठ्या संख्येने मतदारांची नावे वगळायची, हे नेमके कोणाच्या फायद्यासाठी केले जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

SIR प्रक्रिया देशभर एकाच वेळी राबविण्याच्या कायदेशीर आधारावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. माजी केंद्रीय गृहसचिव आर. के. सिंह यांनी SIR ही प्रक्रिया अपवादात्मक परिस्थितीतच राबविता येते, असे म्हटल्याचा दाखला देत देशभर एकाच वेळी Intensive Revision करणे कायदेशीरदृष्ट्या योग्य नसल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला.

‘महाराष्ट्रातील SIR रद्द करा, निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या’  – राज ठाकरेंच्या प्रमुख दोन मागण्या

राज ठाकरे यांनी आपल्या दोन प्रमुख मागण्या स्पष्ट केल्या. महाराष्ट्रात करण्यात आलेली SIR प्रक्रिया रद्द करण्यात यावी आणि आगामी काळात निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्यास मतदान प्रक्रियेबाबतचे सर्व प्रश्न स्पष्ट होतील आणि ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल, असे ते म्हणाले.

दरम्यान, सर्व राजकीय पक्षांनी या मुद्द्यावर एकत्र येऊन दिल्लीमध्ये आवाज उठवावा, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले. उद्या कोणत्याही पक्षाची सत्ता आली तरी चालेल; मात्र ती सत्ता योग्य आणि पारदर्शक पद्धतीने निवडून आलेली असली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीतील उपाययोजनांबाबत आढावा बैठक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

बातमी शेअर करा !
Share
Tags: election commissiongarjana morchamumbai newsraj thackerayuddhav thackeray

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा’; राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात

निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा’; राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात

October 4, 2026
एरंडोल तालुक्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद; अवैध सावकारी विरोधात पोलिसांना कारवाईचे निर्देश

एरंडोल तालुक्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद; अवैध सावकारी विरोधात पोलिसांना कारवाईचे निर्देश

October 4, 2026
जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीतील उपाययोजनांबाबत आढावा बैठक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीतील उपाययोजनांबाबत आढावा बैठक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

October 4, 2026
मराठी ही केवळ संवादाची भाषा नव्हे, तर संस्कृती-इतिहासाची साक्षीदार; डिजिटल युगात मराठीला ज्ञानभाषा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी ही केवळ संवादाची भाषा नव्हे, तर संस्कृती-इतिहासाची साक्षीदार; डिजिटल युगात मराठीला ज्ञानभाषा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 4, 2026
जळगावात स्व. हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व अभिवादन

जळगावात स्व. हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व अभिवादन

October 3, 2026
पाचोरा-भडगावच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी आढावा बैठक

पाचोरा-भडगावच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी आढावा बैठक

October 3, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page