• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जामनेर

जळगाव जिल्ह्यात चारा साक्षरता व संवर्धन अभियानाचा पहूर येथून शुभारंभ

उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 9, 2026
in जामनेर, ताज्या बातम्या
जळगाव जिल्ह्यात चारा साक्षरता व संवर्धन अभियानाचा पहूर येथून शुभारंभ

जळगाव, 9 ऑक्टोबर: अल निनोच्या प्रभावामुळे उद्भवू शकणाऱ्या संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर पशुपालकांमध्ये चारा साक्षरता व चारा संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग, जळगाव यांच्या वतीने ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ दि. 7 ऑक्टोबर 2026 रोजी पशुवैद्यकीय चिकित्सालय, पहूर, ता. जामनेर येथून करण्यात आला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रदीप झोड, जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, जळगाव उपस्थित होते. त्यांनी अभियानाची सविस्तर माहिती देताना उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन आणि कार्यक्षम वापर करण्याची गरज व्यक्त केली.

चारा टंचाई निर्माण होण्यापूर्वी प्रतिबंधात्मक व पूर्वतयारीच्या उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे सांगून डॉ. झोड यांनी पिकांच्या अवशेषांचे जतन, सुरक्षित चारा साठवणूक, मूरघास निर्मिती, अझोला उत्पादन, हायड्रोफोनिक चारा तसेच स्थानिक पातळीवर चारा उत्पादन वाढविणे याबाबत पशुपालकांना मार्गदर्शन केले.

यावेळी डॉ. स्वप्नजा लोखंडे यांनी चारा युरिया प्रक्रियेबाबत, तर डॉ. रामदास जाधव, जळगाव यांनी कडबा कुट्टी व चारा बियाणे याबाबत मार्गदर्शन केले. अभियानाच्या निमित्ताने परिसरातील मागणी केलेल्या ५१ पशुपालकांना चारा उत्पादनासाठी बियाण्यांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पहूर पशुवैद्यकीय दवाखान्याचे प्रमुख डॉ. श्रीकांत व्यवहारे यांनी केले. चारा टंचाईच्या काळात उपलब्ध चाऱ्याचा काटकसरीने व योग्य पद्धतीने वापर करावा. तसेच भविष्यातील चाऱ्याची गरज लक्षात घेऊन चारा पिकांची लागवड व नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

जामनेर तालुक्याचे गट विकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे यांनी दुष्काळी परिस्थितीत जनावरांना वर्षभर पुरेसा व सकस चारा उपलब्ध होण्यासाठी पशुपालकांमध्ये चारा नियोजनाबाबत सातत्याने जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन केले. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील पशुपालकांनी वैरण विकास योजनेंतर्गत चारा पिकांच्या लागवडीसाठी बियाणे मिळविण्याकरिता नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात आपली मागणी नोंदवावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभाग, जळगाव यांच्या वतीने करण्यात आले.

कार्यक्रमास डॉ. शामकांत हिरे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, जळगाव, बाबुराव घोंगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य, प्रदीपभाऊ लोढा, माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती, शंकर जाधव, राजू जाधव, उपसरपंच, पहूर कसबे, ॲड. संजय पाटील, रमेश नागपुरे, शिवदास गव्हाळे, तसेच ग्रामविकास अधिकारी, पहूर कसबे व पहूर पेठ आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पाटील, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, नाचणखेडा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एकनाथ बारी, सुनील बारी, मिलिंद बारी, दादाराव पाटील,   अशोक जाधव, संजय पाटील व नरेंद्र गोसावी यांचे सहकार्य लाभले. योगेश पाटील यांनी आभार मानले.

हेही वाचा: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर अनंतात विलीन; पुण्यातील डोणजे गावात शासकीय इतमामात पार पडले अंत्यसंस्कार

बातमी शेअर करा !
Share
Tags: fodder literacy and conservation campaignjalgaon newsmarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“मंगेश चव्हाण यांनी आमदारकीच्या शपथेतील आचारसंहितेचे उल्लंघन करून पदाचा गैरवापर केला” – आमदार किशोर आप्पा पाटील

“मंगेश चव्हाण यांनी आमदारकीच्या शपथेतील आचारसंहितेचे उल्लंघन करून पदाचा गैरवापर केला” – आमदार किशोर आप्पा पाटील

November 24, 2026
जळगाव जिल्हा बँक निवडणूक वाद: आमदार मंगेश चव्हाण यांनी सर्व आरोप फेटाळले; लवकरच पत्रकार परिषदेत बाजू मांडणार

जळगाव जिल्हा बँक निवडणूक वाद: आमदार मंगेश चव्हाण यांनी सर्व आरोप फेटाळले; लवकरच पत्रकार परिषदेत बाजू मांडणार

November 24, 2026
गावांच्या विकासासाठी अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी एकजुटीने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

गावांच्या विकासासाठी अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी एकजुटीने काम करावे – पालकमंत्री गुलाबराव पाटील

November 23, 2026
‘अन्याय झाला तर संताप केल्याशिवाय  राहणार नाही’; सुमित पाटील यांचा इशारा, बिनविरोध निवडीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नेमकं काय म्हणाले?

‘अन्याय झाला तर संताप केल्याशिवाय राहणार नाही’; सुमित पाटील यांचा इशारा, बिनविरोध निवडीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नेमकं काय म्हणाले?

November 22, 2026
“सुमित, तू काळजी करण्याची गरज नाही; तुझ्या वक्तव्याचे तुझा बाप समर्थन करतो” – आमदार किशोर आप्पा पाटील

“सुमित, तू काळजी करण्याची गरज नाही; तुझ्या वक्तव्याचे तुझा बाप समर्थन करतो” – आमदार किशोर आप्पा पाटील

November 22, 2026
राज्यातील अधिकाऱ्यांनी जनभावना जाणून काम करावे – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

राज्यातील अधिकाऱ्यांनी जनभावना जाणून काम करावे – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

November 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page