• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यातील प्रदुषण नियंत्रणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या महत्वाच्या सूचना

वायू प्रदुषण सूचनांच्या अंमलबजावणीसाठी विशेष पथके नियुक्त

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 9, 2023
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या, ब्रेकिंग
फाईल फोटो

फाईल फोटो

जळगाव, 9 नोव्हेंबर : राज्यातील प्रदुषण नियंत्रणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. या सूचनांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठीच्या उपाय योजना राबविण्याचे आवाहन केले‌ आहे. या सूचनांच्या अंमलबजावणीसाठी विशेष पथके नियुक्त करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

लोकचळवळ निर्माण झाली पाहिजे –
जिल्ह्यातील बांधकाम स्थळे धुळमुक्त आणि स्वच्छ करावीत. अण्टी स्मॉग गन, स्प्रिंकलर्सचा वापर वाढवावा. जळगाव शहर व जिल्ह्यातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस, महापालिका आयुक्त व जिल्ह्यातील विविध यंत्रणांनी एकत्रितपणे कार्यवाही करावी. नागरिकांना प्रदुषण रोखण्याच्या मोहिमेमध्ये सहभागी करून

जिल्हाधिकाऱ्यांच्या महत्वाच्या सूचना –
बांधकामे, विकास प्रकल्पांची कामे यामुळे धुळीचे साम्राज्य पसरू नये म्हणून पाण्याची फवारणी करून रस्ते स्वच्छ करावीत त्याचबरोबर साचलेली धुळे साफ करण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. बांधकाम ठिकाणांवर धुळ रोखण्यासाठी पत्रे लावतानाच ही सर्व ठिकाण धुळमुक्त करण्यात यावेत. कामांच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या पत्र्यांमुळे रस्त्यांवरून जाताना नागरिकांना त्रास होणार नाही याचीही दक्षता घ्यावी.

वाहतूक विभागाने कारवाई करावी –
पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडून देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करतानाच शहरातील सर्वाधिक प्रदुषण होणारी ठिकाणांवर संनियंत्रण करण्यात यावे. वाहनांमधून रस्त्यांवरील माती, डेब्रीज वाहून नेताना ती झाकून वाहतूक करावी तसे न करणाऱ्या वाहनांवर वाहतूक विभागाने कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दिल्या आहेत.
रात्री उशिरा बांधकाम आणि विध्वंस कचरा / मलबाची अवैध डम्पिंग रोखण्यासाठी विशेष पथके काम करणार आहेत. पथकाने संबंधित परिसराला भेट देऊन, कार्यस्थळाची चित्रफित (व्हिडिओ ग्राफ) काढावी व सदर अंमलबजावणी करीत असताना तरतुदींचे पालन न झाल्याचे निदर्शनास आल्यास, बांधकाम कार्यस्थळ यांच्यावर बांधकाम थांबविण्याच्या नोटीस / कार्यस्थळ सील करणे यासारखी कठोर कारवाई तात्काळ करावी.

परिपत्रक जारी केल्यापासून सर्व प्रकल्प प्रस्तावक / कंत्राटदारांना स्प्रिंकलरच्या खरेदीसाठी १५ दिवसांची आणि स्मॉग गनच्या खरेदीसाठी ३० दिवसांची मुदत असेल व सदर वेळेचे न चुकता वरीलप्रमाणे पालन करावे. बांधकाम साहित्य किंवा C & D साहित्य वाहून नेणारी वाहनांवर वाहन ट्रॅकिंग यंत्रणा बसवावी, जर वर नमूद केलेल्या तरतुदींचे पालन होत नसेल तर प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) / पोलीस विभागाकडून यांच्याकडून जप्तीची कारवाई करण्यात यावी.

ओव्हरलोड वाहने, न उघडलेली वाहने रस्त्यांवर बांधकाम साहित्य सांडणाऱ्या वाहनांवर परिवहन विभागाने योग्य ती कारवाई करावी. जुन्या (End of Life Vehicles )वाहनांसाठी वाहन स्क्रॅपेज धोरणाच्या अंमलबजावणीसाठी प्रोत्साहन दिले जावे. साहित्य वाहून नेणाऱ्या सर्व वाहनांकडे वैध PUC प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे आणि ते सक्षम अधिकाऱ्यांने विचारल्यास उपलब्ध करावे. प्रदुषण नियंत्रण मंडळाने उद्योगांमधून उत्सर्जित होणाऱ्या वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवावे.

मोकळया जागेमध्ये पालापाचोळा किंवा घरगुती घनकचरा जाळण्यास निर्बंध असतील. महानगरपालिका / नगरपरिषद क्षेत्रातील सर्व रस्त्यांना पक्के फूटपाथ करावेत. बेकरीमध्ये वापरात जीवाश्म प्रदूषणकारी इंधनाच्या ऐवजी स्वच्छ पर्यायी इंधन, जसे की इलेक्ट्रिक ओव्हन, पीएनजी किंवा इतर पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी दिशानिर्देश जारी करावे, विद्युत किंवा इतर पर्यावरणास अनुकूल इंधनाचा वापर करुन, स्मशानभूमीच्या अंत्यसंस्काराच्या सुविधा रुपांतरीत करण्यासाठी संबंधित आस्थापनाने सक्रिय पावले उचलावीत.

प्रदुषण मंडळाने स्थापित केलेल्या सतत हवा गुणवत्ता देखरेख केंद्रांची नियमितपणे महापालिका प्राधिकरणाद्वारे तपासणी/निरीक्षण करावेत. जिल्ह्यातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे प्रदुषण नियंत्रणाच्या मोहीमेत सहभाग घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व प्रदुषण नियंत्रण मंडळाने केले आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: air pollution jalgaonias ayush prasadjalgaon air pollutionjalgaon news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अर्थसंकल्प सादर; वाचा अर्थसंकल्पातील टॉप-10 घोषणा

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अर्थसंकल्प सादर; वाचा अर्थसंकल्पातील टॉप-10 घोषणा

March 7, 2026
VIDEO | ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनाचा मुद्दा; विधानसभेत रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनाचा मुद्दा; विधानसभेत रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिली महत्वाची माहिती

March 6, 2026
आज सादर होणार राज्याचा अर्थसंकल्प; देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडणार, घोषणांकडे सर्वांचं लक्ष

आज सादर होणार राज्याचा अर्थसंकल्प; देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडणार, घोषणांकडे सर्वांचं लक्ष

March 6, 2026
‘गरजूंना घर देण्यासाठी शासन कटिबद्ध; गेल्या वर्षात राज्यात जवळपास 4 लाख घरे पूर्ण’, ग्रामविकास मंत्र्यांची माहिती

‘गरजूंना घर देण्यासाठी शासन कटिबद्ध; गेल्या वर्षात राज्यात जवळपास 4 लाख घरे पूर्ण’, ग्रामविकास मंत्र्यांची माहिती

March 6, 2026
Breaking News: अखेर ठरलं! माजी खासदार उन्मेश पाटील शिंदेंच्या शिवसेनेत जाणार; उद्या मुंबईत होणार पक्षप्रवेश

Breaking News: अखेर ठरलं! माजी खासदार उन्मेश पाटील शिंदेंच्या शिवसेनेत जाणार; उद्या मुंबईत होणार पक्षप्रवेश

March 5, 2026
VIDEO | विधानपरिषदेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | विधानपरिषदेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली महत्वाची माहिती

March 5, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page