ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 22 जानेवारी : मी कारसेवक होऊ शकलो नाही मात्र रामसेवक होण्याचे भाग्य मला मिळाले, असे प्रतिपादन आमदार किशोर पाटील यांनी पाचोऱ्यातील श्रीराम मंदिराच्या सुशोभीकरणाच्या भूमीपूजन सोहळ्यानिमित्त केले. यावेळी आमदार पाटील यांनी पाचोऱ्यातील राम मंदिरच्या निर्माणासाठी सुंदर अशी समावेशक समिती तयार करावी तसेच यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
काय म्हणाले आमदार किशोर पाटील? –
आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते आज पाचोऱ्यातील प्रभू श्रीराम मंदिराचा भूमीपूजन सोहळा पार पडला. यावेळी आमदार किशोर पाटील यांनी उपस्थितांना संबोधित केले. हजारो वर्षांपासूनचे पुरातन हे मंदिराचे येणाऱ्या एक-दोन वर्षांत अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या धर्तीवर आमचे हे पुरातन, आमच्या पुर्वजांनी उभी केलेली ही वास्तूची नवचैत्यन्यामध्ये निर्मिती व्हावी, अशी प्रार्थना आमदार किशोर पाटील यांनी यावेळी केली.
सर्वांनी सहकार्य केल्यास अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या धर्तीवर पाचोऱ्यातील प्रभू श्रीरामचंद्राचे सौंदर्य उभे झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच शासनाच्या अटींमुळे मी जरी मंदिर-मस्जिदला निधी देऊ शकत नसलो, तरी या श्रीराम मंदिराच्या परिसराला लागणारा आवश्यक तो निधी देण्याची जबाबदरी एक रामभक्त म्हणून आमदार किशोर पाटील यांनी स्विकारली. दरम्यान, या कार्यक्रमात पाचोरा-भडगाव शिवसेनेचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
हेही वाचा : Ayodhya Ram Mandir Sohala : हा क्षण विजयासोबत विनम्रतेचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी