ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा (जळगाव), 24 फेब्रुवारी : पाचोरा तालुक्यातील राजुरी येथील प्रगतशील शेतकरी प्रविण रामराव पाटील यांना यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून “उद्यानपंडीत पुरस्कार – 2020” जाहीर झाला आहे. याबाबतचे शासनाने परिपत्रक जारी केले आहे. शेतकरी पुरस्कार मिळविणाऱ्यांमध्ये जळगाव जिल्ह्यातील 12 शेतकऱ्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांच्या पुरस्काराने गौरव केला जातो. यानिमित्त 2020, 2021,2022 या वर्षासाठीचे विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, उद्यानपंडीत पुरस्कार – 2020 हा प्रविण पाटील यांना जाहीर करण्यात आला.
खान्देशातील 18 शेतकऱ्यांना पुरस्कार –
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून खान्देशातील 18 शेतकऱ्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये जळगावातील 12, धुळे 1 आणि नंदुरबारातील 5 शेतकऱ्यांना कृषी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
विविध श्रेणीतून जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेले पुरस्कार –
- जिजामाता कृषीभूषण पुरस्कार – 2020
राजश्री राजेश पाटील (हिंगोणे, ता. अमळनेर) - कृषीभूषण (सेंद्रीय शेती) पुरस्कार – 2020
आशिषकुमार प्रविणभाई पटेल (चाळीसगाव) - युवा शेतकरी पुरस्कार 2020
मल्हार प्रल्हाद कुंभार (चोरवड ता. पारोळा) - वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) 2020
प्रशांत वसंत महाजन (तांदळवाडी, ता. रावेर) - वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (आदिवासी गट) 2020
रज्जाक अमीर तडवी (धानोरा, ता. चोपडा) - जिजामाता कृषीभूषण पुरस्कार – 2021
सिमा धनंजय पाटील (पिंप्री ता. चाळीसगाव) - वसंतराव नाईक शेतकरी मित्र पुरस्कार 2021
नाना भाऊसिंग पाटील (पिंप्री, ता. चाळीसगाव) - युवा शेतकरी पुरस्कार 2021
मोहन सिताराम वाघ (गोरनाळा, ता. जामनेर) - वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) 2021
निळकंठ दगडू पाटील (राजवड ता. पारोळा) - वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार सन 2022
रविंद्र माधवराव महाजन (जामनेर) - वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) 2022
ज्ञानेश्वर जोगीलाल पाटील (कुसुंबा, ता.चोपडा)