नाशिक, 3 मार्च : राज्यभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना शिक्षकानेच विद्यार्थीनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सहली दरम्यान शिक्षकाने दोन विद्यार्थींनींचा विनयभंग केल्याची माहिती समोर आली आहे.
काय आहे संपूर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात कॅनडा कॉर्नर परिसरातील एका शाळेची सहल सिंधुदुर्ग येथे गेली होती. मालवणहून नाशिकला येत असताना दि. 5 जानेवारी रोजी रात्री दोन ते सकाळी सहा वाजेच्या दरम्यान संशयित भाऊसाहेब किसन सानप (रा. कॅनडा कॉर्नर, नाशिक) या शिक्षकाने पान खाऊन खिडकीतून थुंकण्याच्या बहाण्याने दोन विद्यार्थिनींच्या शेजारी बसून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.
पोलिसांत गुन्हा दाखल –
सहलीनंतर पीडित विद्यार्थिनींनी पालकांना याबाबत सांगितल्यांनंतर सानप यांच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात पोक्सो, विनयभंग व अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, . शालेय व्यवस्थापनानेही चौकशी करुन संशयितास निलंबित केल्याची माहिती मिळत समोर आली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा : Parola Accident : टॅक्टरने दिलेल्या धडकेत वृद्ध ठार, पारोळा तालुक्यातील घटना