जळगाव, 3 मार्च : जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहे.
‘असा’ असेल दौरा :
- उद्या, 4 मार्च रोजी सकाळी 9.30 वा. मुंबई विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने जळगावकडे प्रयाण.
- सकाळी 10.30 वा. जळगाव विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने पोलीस मुख्यालय हेलिपॅड, वाशिमकडे प्रयाण.
- सोमवार दि. 4 मार्च, 2024 रोजी दुपारी 2.55 वा. पोलीस मुख्यालय हेलिपॅड, वाशिम येथे आगमन व हेलिकॉप्टरने मौज मुंढोळदे (खडकाचे) ता. मुक्ताईनगर, जि.जळगावकडे प्रयाण.
- दुपारी 3.55 वा. मौजे मुंढोळदे (खडकाचे) हेलिपॅड, ता. मुक्ताईनगर, जि.जळगाव येथे आगमन व मोटारीने कार्यक्रम स्थळाकडे प्रयाण.
- सायंकाळी 4.00 वा. मौजे मुंढाळदे (खडकाचे) ता. मुक्ताईनगर ते सुलवाडी ऐनपूर, ता. रावेर, जि.जळगाव या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या तापी नदीवरील पुलाचे बांधकामाचे भूमीपुजन, (स्थळ- मौज मुंढोळदे (खडकाचे) ता. मुक्ताईनगर, जि.जळगाव).
- सायं. 4.45 वा. आमदार चंद्रकांत पाटील मुक्ताईनगर यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट.
- सायं. 5.00 मौजे कोथळी ता. मुक्ताईनगर, जि.जळगाव येथे श्री. संत मुक्ताई मंदिर येथे दर्शन.
- सायं. 5.10 वा. मोटारीने मौज मुंढोळदे (खडकाचे) हेलिपॅड, ता. मुक्ताईनगर, जि.जळगावकडे प्रयाण.
- सायं. 5.15 वा. मौज मुंढोळदे (खडकाचे) हेलिपॅड, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव येथे आगमन व हेलिकॉप्टरने जळगावकडे प्रयाण.
- सायं. 5.40 वा. जळगाव विमानतळ येथे आगमन व मोटारीने खेडी जळगावकडे प्रयाण,
- सायं. 5.55 वा. खेडी जळगाव येथे आगमन व वारकरी भवनाचे भूमिपुजन सोहळा,
- सायं. 6.10 वा. मोटारीने जळगाव विमानतळकडे प्रयाण.
- सायं. 6.20 वा. जळगाव विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबई विमानतळाकडे प्रयाण.
हेही वाचा : ‘जो मराठा समाजासाठी आडवा येतोय, त्याला निवडणुकीत…..’, विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?