संदीप पाटील, प्रतिनिधी
पारोळा, 16 मार्च : पारोळा शहरातील 16.70 कोटी रूपयांच्या विविध विकासकामांचे आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते भुमीपुजन व लोकार्पण सोहळा काल पार पडला. यावेळी जळगाव लोकसभा महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्यासह जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष चिमणराव पाटील, नगराध्यक्ष दयाराम पाटील, सुरेंद्र बोहरा, तालुकाप्रमुख मधुकर पाटील उपस्थित होते.
यामध्ये आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते पारोळा ते पुनगांव रस्त्याचा भुमीपुजन सोहळा करण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याची दुरावस्था झाली होती. यामुळे शेतकऱ्यांना दळणवळणासह अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. दरम्यान, या रस्त्याच्या भुमीपूजन सोहळ्यामुळे रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक शेतकऱ्यांकडून आमदार चिमणराव पाटील व अमोल पाटील यांचे आभार मानत सत्कार करण्यात आला. तसेच शहरातील धोबी, नाभिक, गोसावी, नाथजोगी समाजासाठी सामाजिक सभागृह उपलब्ध करून देण्यात आले.
यावेळी शेतकी संघाचे अध्यक्ष मिलिंद मिसर, देवगांव सरपंच समिर पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रशांत पाटील, बाजार समितीचे मा.संचालक प्रा.बी.एन.पाटील, शेतकी संघाचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील, शहरप्रमुख अमृत चौधरी, शेतकी संघाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील, शेतकी संघाचे संचालक भैय्या पाटील, गणेश पाटील, भिडुभाऊ जाधव, गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील, विनोद खाडे यांच्यासह श्रीनाथ नगर, गणपती नगर, भंडारी नगर येथील रहिवासी, नाभिक समाज मंडळाचे पंच मंडळ, धोबी समाज पंच मंडळ, गोसावी व नाथजोगी समाजाचे पंच मंडळ यांचेसह आदी मान्यवर व शहरवासीय उपस्थित होते.
या विकासकामांचा झाले भुमीपुजन व लोकार्पण –
- पारोळा शहरातील बोहरा सेंट्रल स्कुल जवळील गट नं. 138 मध्ये बगीचा व विविध विकासकामे करणे – 70 लक्ष
- पारोळा शहरात प्रवेश करणाऱ्या उंदिरखेडा नाका ते न.पा.हद्द, अमळनेर नाका ते न.पा.हद्द, कजगांव नाका ते न.पा.हद्द, भडगांव नाका ते न.पा.हद्द, कासोदा नाका ते न.पा.हद्द, धरणगांव माथा ते न.पा.हद्द व पाटील माथा ते दिल्ली दरवाजा या मुख्य रस्त्यांवर विद्युतीकरण करणे – 4 कोटी
- पारोळा शहरातील धुळे रोड लगत असलेल्या स्मशानभुमी परिसरात बैठक व्यवस्था, बंदीस्त सभागृह व इतर सुशोभिकरणाची कामे करणे – 1 कोटी
- पारोळा शहरातील अमळनेर नाका परिसराचे सुशोभिकरण करणे – 50 लक्ष
- पारोळा शहरातील अमळनेर नाका ते शनि मंदीर चौकापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे -3 कोटी
- पारोळा शहरातील महादु आप्पा नगर भागात नाभिक समाजासाठी सामाजिक सभागृहाचे बांधकाम करणे – 35 लक्ष
- पारोळा शहरापासुन ते पुनगांव पर्यंत रस्त्याची सुधारणा करणे – 2 कोटी
- पारोळा शहरातील भगवान नथ्थु नगर भागातील खुल्या जागेत सुशोभिकरण करणे – 25 लक्ष
- पारोळा तालुका क्रीडा संकुलाचे नुतनीकरण व इतर सुशोभिकरणाची कामे करणे – 4.20 कोटी
- पारोळा नगरपरिषद हद्दीतील धरणगांव रोड लगत धोबी समाजासाठी सामाजिक सभागृहाचे बांधकाम करणे- 35 लक्ष
- पारोळा शहरातील धरणगांव रोड लगत असलेल्या गोसावी समाजाचा दफनभुमीला वालकंपाऊंड बांधणे – 35 लक्ष
हेही वाचा : मोठी बातमी! राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षकांसाठी ड्रेस कोड लागू होणार