• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘ईव्हीएमशिवाय नरेंद्र मोदी निवडणूक जिंकु शकत नाहीत,’ भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपात राहुल गांधींचा हल्लाबोल

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 17, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, देश-विदेश, ब्रेकिंग
‘ईव्हीएमशिवाय नरेंद्र मोदी निवडणूक जिंकु शकत नाहीत,’ भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपात राहुल गांधींचा हल्लाबोल

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

मुंबई, 17 मार्च : ईव्हीएमशिवाय नरेंद्र मोदी निवडणूक जिंकु शकत नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज मुंबईत समारोप झाला. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी देशातील बेरोजगारी महागाई यासारख्या मुद्यांवरून पंतप्रधान मोदींसह सरकारवर जोरदार टीका केली.

मुंबईत राहुल गांधी नेमकं काय म्हणाले? –

निवडणूक आयोगाला आम्ही सांगितले की, विरोधी पक्षाला या मशिन खोलून दाखवा. या कशा चालतात आमच्या एक्सपर्टला दाखवा. यातून कागद निघतो. मतदान मशिनमध्ये नाही. तर कागदमध्ये आहे. मशिन तुम्ही चालवा. मात्र, आम्हाला कागद मोजून दाखवा. मात्र, निवडणूक आयोगाने त्याला नकार दिला आणि कागदाची मोजणी होऊ शकत नसल्याचे सांगितले. का नाही होणार, कशी नाही होणार, व्यवस्थेला नकोय की ईव्हीएमची मोजणी व्हावी. कारण, ही व्यवस्था नागरिकांच्या पैशाची चोरी करण्याची व्यवस्था आहे, अशी जोरदार टीका त्यांनी केली.

काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की, मागच्या वर्षी कन्याकुमारीपासून काश्मिरपर्यंत आम्ही यात्रा केली. यात्रा करावी लागली. जर मी स्वत:ला विचारतो 2004, 2010 आणि 2014 मध्ये की मला 4 हजार किमी कन्याकुमारीपासून काश्मिरपर्यंत चालावे लागेल, मी असा विचारही करू शकत नव्हतो. ही यात्रा आम्हाला का करावी लागली, कारण देशाची संवाद व्यवस्था, मग पत्रकार असो, सोशल मीडिया असो ते आज देशाच्या हातात नाही.

जनतेचे मुद्दे बेरोजगारी, हिंसा, महगाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, अग्नीवीराचे मुद्दे ते मुद्दे मीडियात दिसत नाही. त्यामुळे ही यात्रा करावी लागली. कारण दुसरा काहीच पर्याय नव्हता. देशाचे लक्ष पकडण्यासाठी विरोधी पक्षाला 4 हजार किमीची यात्रा करावी लागली. ही यात्रा फक्त राहुल गांधीने नाही केली. सर्व विरोधी पक्षांनी यात सहभाग नोंदवला असल्याचे गांधी यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल –

राहुल गांधींना पंतप्रधान मोदींवर टीका करत सांगितले की, नरेंद्र मोदी भाईयो और बहनो फक्त मास्क आहे. मुखवटा आहे. जशा या बॉलिवूडमधील कलाकारांना भूमिका दिली गेली आहे. 56 इंचची छाती नाही. पोकळ व्यक्ती आहे. धारावीला तुम्ही पाहा. मला विचारण्यात आले, की ही यात्रा कुठून कुठे असेल. मी विचार केला, एक स्पष्ट होते की मणिपूरमधून होईल. त्याठिकाणी या शक्तीने सिव्हील वॉरचे वातावरण तयार केले आहे.

ते पुढे म्हणाले की, कुणीतरी म्हटलं की, सोशल मीडिया हा एक पर्याय आहे. मात्र, त्यावरही नियंत्रण आहे. अमेरिकेच्या कंपन्यांवर दबाव आहे. त्यामुळे खूप चर्चा होते, की आणि भाजपसोबत लढतोय. लोक विचार करतात की, आम्ही सर्व एक राजकीय पक्षाविरोधात लढत आहोत. देशही विचार करतो की, हे सर्व नेते जे मंचावर आहोत, वेगवेगळ्या पक्षाचे आहेत, जे एका राजकीय पक्षाविरोधात लढत आहेत मात्र हे खरं नाही.

तरुणाईला हे समजून घेण्याची गरज आहे. कुणीतरी म्हणतो हे सर्व नरेंद्र मोदीविरोधात लढत आहे. पण नाही. आम्ही नरेंद्र मोदी आणि भाजपविरोधात लढत नाही. एका व्यक्तीला चेहरा बनवून वरती टाकले आहे. हिंदू धर्मात शक्ती शब्द असतो. आम्ही शक्तीविरोधात लढत आहोत. आता एक प्रश्न येतो, ती शक्ती काय आहे? राजा की आत्मा ईव्हीएम मे है… हे खरं आहे. राजाची आत्मा ईव्हीएममध्ये आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, हिंदूस्तानच्या ईडी, सीबीआय या प्रत्येक संस्थेत आहे. याच राज्यातील वरीष्ठ नेते काँग्रेस पक्षाला सोडतात आणि रडून सांगतात की, सोनियाजी मला लाज वाटतेय, मला या शक्तिविरोधात लढण्याची ताकद नाही. मला तुरुंगात जायचे नाही. आणि हे एकच नाही तर असे हजारो लोकांना घाबरवले जात आहे.

शिवसेनेचे लोक, एनसीपीचे लोक असेच गेले नाही. ज्या शक्तीबाबत मी बोलत आहे, त्यांनी त्यांचा गळा पकडून आपल्या जवळ केले. हे सर्व घाबरून तिकडे गेले. मी आता 4 हजार किमी चाललो. आधी 6 हजार किमी चाललो. मी काय पाहिलं, मला काय समजले हे मी शब्दात नाही सांगू शकत.

माझ्याजवळ एक तरुण येतो, सुरक्षारक त्याला मारतात. तरीही तो येतो, डोळ्यात अश्रू, मला म्हणतो राहुलजी, मी तीन वर्षे प्रत्येक दिवशी सकाळी रनिंग केली. तयारी केली. माझ्या मनात देशभक्ती होती. मी जायचो… की मी लडाखमध्ये जाऊन थंडीत देशाची सेवा करू. एक दिवस संधी मिळाली तर त्यांची गोळीही खाऊ. राहुलजी यांनी अग्नीवीर लागू केला. मला देशाने मला धोका दिला. नाही तुमच्या देशाने तुम्हाला धोका नाही दिला. त्याच शक्तीने तुम्हाला धोका दिला असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.

हेही वाचा : मोठी बातमी! सात टप्प्यात होणार लोकसभा निवडणूक, खान्देशात ‘या’ तारखेला होणार मतदान

बातमी शेअर करा !
Share
Tags: bharat jodo nyay yatracongressmumbairahul gandhi

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page