चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
पाचोरा, 8 मे : “मागचा जो निष्क्रिय खासदार होता, उन्मेश पाटील याची पहिल्यांदा तुम्ही उमेदवारी रद्द केली त्याबद्दल मी तुमचे हात जोडून आभार मानतो. ज्या माणसाने 5 वर्षांत काम कमी जास्त आम्ही समजू शकतो. आम्ही तर प्रश्न विचारतो की, तु या मतदारसंघामध्ये मुतारी दाखव. ते मुतारी सोडा पण आमच्या सुखादु:खामध्ये सुद्धा हा खासदार, 5 वर्षामध्ये कधी आला नाही”, या शब्दात आमदार किशोर पाटील यांनी माजी खासदार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उन्मेश पाटील यांच्यावर केली. आज पाचोरा येथे जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचाराच्या निमित्ताने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उन्मेश पाटील यांच्यासह महाविकास आघाडी, इंडिया आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली.
एकेरी उल्लेख करत उन्मेश पाटलांवर साधला निशाणा –
“मागचा जो निष्क्रिय खासदार होता, उन्मेश पाटील याची पहिल्यांदा तुम्ही उमेदवारी रद्द केली त्याबद्दल मी तुमचे हात जोडून आभार मानतो. ज्या माणसाने 5 वर्षांत काम कमी जास्त आम्ही समजू शकतो. आम्ही तर प्रश्न विचारतो की, तु या मतदारसंघामध्ये मुतारी दाखव. ते मुतारी सोडा पण आमच्या सुखादु:खामध्ये सुद्धा हा खासदार, 5 वर्षामध्ये कधी आला नाही. 5 वर्ष सत्तेत होता 5 वर्ष आमदारकीच्या सत्तेत होता. कुठली विकासकामे केली नाहीत आणि आता जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळे प्रश्न तो जनतेला विचारत आहे. गिरीशभाऊं सारख्यांवर नको ते आरोप-प्रत्यारोप करत आहे. लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतोय. आज मला सांगायचंय, हा काय चाटा मारतोय. याच्या मनामध्ये एक खोट आहे”, या शब्दात आमदार किशोर पाटील यांनी माजी खासदार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उन्मेश पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.
नाव न घेता उद्धव ठाकरेंवर आमदार किशोर पाटलांची टीका –
ही निवडणूक गल्लीची नाही तर दिल्लीची निवडणूक आहे. आज आमची छाती भरुन येते, ज्याप्रमाणे मोदीजी देशाचं नेतृत्त्व करत आहे. इथे कुणीतरी येतं, मोदीजींवर टीका करतं. तुमची लायकी नसताना तुम्ही मोदीजींवर टीका करतात, असं नाव न घेता उद्धव ठाकरेंवर त्यांनी टीका केली. ते पुढे म्हणाले की, आमच्यामध्ये धमक आहे. या युतीमध्ये धमक आहे की नरेंद्र मोदीजींच्या नावावर हा संपूर्ण भारत त्यांच्या पाठीशी आहे. यांचं एकही नाव समोर येत नाही. यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण आहे, हे आम्हाला माहिती नाही मग आम्ही नेमकं कुणाच्या पाठीशी उभं राहणार आहोत, असा सवाल करत त्यांनी इंडिया आघाडीवर टीका करत त्यांनी महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांना प्रचंड बहुमतांनी निवडून देण्याचे आवाहन केले.
आमदार किशोर पाटलांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी –
गिरणा डॅमवरुन पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी गेल्या 35-40 वर्षांपूर्वीचा जुना कॅनॉल आहे. त्या कॅनॉलची आजची स्थिती अशी आहे की, त्यातून 25 टक्के पाणीसुद्धा शेवटपर्यंत पोहोचत नाही आणि म्हणून त्याचं इस्टिमेट तयार आहे. माझी आपल्याला विनंती आहे की, त्या कॅनॉलचं काम जर झालं तर माझा पाचोरा आणि भडगाव तालुका 100 टक्के सिंचनाखाली येईल.
आमच्या गिरणा मातेचे धरण आहे. मला माहिती नाही. मागे काय झालं. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून बलूनचा डॅमबाबत चर्चा सुरूए. खरं म्हणजे बलून डॅम हा गिरणा नदीवर यशस्वी नाही. कारण त्याला जर शांत नदी असेल तरच त्याठिकाणी तो होऊ शकतो. परंतु माझी आपल्याला विनंती आहे की, जवळपास 7 बलून बंधाऱ्यांचं इस्टिमेट 700 ते 800 कोटींवरून आता 1000-1200 कोटींवर गेलंय. ते बलून कॅन्सल करुन त्या बलूनच्या जागेवर जर आपण पक्के बंधारे दिले तर माझा मतदारसंघ सुजलाम सुफलाम होईल.
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे केले कौतुक –
मी उपमुख्यमंत्र्यांना आश्वस्त करू इच्छितो की, हा महायुतीचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघाने गेल्या 20-30 वर्षांपासून महायुतीचे खासदार निवडून दिले आहे. पण मला अभिमानाने सांगावसं वाटतं की, जळगाव लोकसभा मतदारसंघात सर्वात जास्त मताधिक्य पाचोरा भडगाव मतदारसंघाने दिलं. मागच्या वेळी 75 हजारांचे मताधिक्य होतं. यावेळी आम्ही आमचा रेकॉर्ड ब्रेक करून हे मताधिक्य 1 लाखांपर्यंत पोहोचवू. हा मतदारसंघ भावनेवर चालणारा नाही. हा मतदारसंघ विकासकामे करणाऱ्यांच्या पाठीशी उभा राहणारा आहे. इथं रस्त्यांची कामं झाली, पाण्याची कामं झाली, वेगवेगळ्या विकासांची कामं झाली. माझे शहर आणि मतदारसंघ या जळगाव जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट मतदारसंघ म्हणून विकासकामांमध्ये ओळखला जातो, असं चित्र याठिकाणी आहे. याला जबाबदार तुम्ही आणि मुख्यमंत्री महोदय आहेत, या शब्दात त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केले. दरम्यान, या सभेला उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ तसेच मंत्री गिरीश महाजन, अनिल पाटील, मंगेश चव्हाण, महायुतीचे नेते उपस्थित होते.
यावेळीमंत्री ना.गिरीश महाजन, ना. अनिल पाटील, आ.मंगेश चव्हाण, आ.राजू भोळे, महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ, माजी आ.दिलीप वाघ, संजय गोहिल, डॉ.निळकंठ पाटील, आनंद खरात, अमोल शिंदे, मधुकर काटे, डी.एम.पाटील, नाना पाटील, सुभाष मुडे, रमेश वाणी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.