चोपडा, 16 जून : माजी खासदार, आमदार तथा जिल्हाध्यक्ष कृषी मित्र शेतकरी नेते स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांच्या चौथ्या पुण्यस्मरण कार्यक्रमप्रसंगी भारतीय जनता पार्टी चोपडा येथील कार्यकर्त्यांनी श्रद्धेय भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. स्वर्गीय हरिभाऊंनी चोपडा तालुक्यासाठी केलेल्या विकासाच्या कामाना कार्यकर्त्यांनी यावेळी उजाळा दिला.
तसेच चोपडा शहरातील कार्यकर्ते विलास लोहार यांना MIDC चोपडा येथे व्यवसायासाठी स्वतःचे दुकान त्याठिकाणी व्हावे यासाठी भाऊंनी मदत केली. त्यामुळे आज त्यांना भाऊंची आठवण होते. दरम्यान, त्यांनी स्वर्गीय भाऊंनी त्यांच्या व्यवसायासाठी केलेली मदतीची आठवण त्यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना सांगितली.
स्वर्गीय हरिभाऊंनी अभिवादन करण्याप्रसंगी औद्यगिक वसाहतीचे चेअरमन महेंद्र सोनार, भा.ज.पा ता.सरचिटणीस विजय बाविस्कर, कामगार आघाडी जिल्हा सरचिटणीस,व सो. मी. प्रमुख मिलिंद वाणी, कामगार आघाडी शहराध्यक्ष विलास लोहार, विधानसभा, उद्योग आघाडी ता.अध्यक्ष विठ्ठल पाटील, अनु.ज.शहराध्यक्ष अभिषेक सूर्यवंशी,लक्ष्मण पाटील, नितीन चौधरी, कैलास लोहार, राजू तडवी, भूपेंद्र पाटील आदींनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
हेही वाचा : विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा-महाविद्यालयातच मिळणार आता एसटीचा पास, काय महामंडळाची विशेष मोहीम?