जळगाव, 7 जुलै : नवी मुंबईसह ठाणे, पनवेल परिसरात रात्रभरापासून मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. दरम्यान, राज्यासह जळगाव जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.
मुंबईत मुसळधार पाऊस –
मुंबईत रात्रभरापासून धो-धो पाऊस बरसतोय. रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले असून, अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाल्याची देखील माहिती समोर आली आहे. मुसळधार पावासमुळे काही नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. दरम्यान, मुंबईतील मुसळधार पावसामुळे लोकल ट्रेनवर परिणाम झालाय.
राज्याचा हवामान अंदाज –
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील बहुतांश भागात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला असून कोकणसह मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, या भागात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्याचा काय आहे हवामान अंदाज? –
जळगाव जिल्ह्यात काल दिवसभर पावसाची रिपरिप पाहायला मिळाली. जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून रात्रीपर्यंत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.
हेही वाचा : काश्मिरात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत अकोल्याचा जवान प्रवीण जंजाळ शहीद, चार अतिरेकी ठार