चोपडा, 8 जुलै : चोपडा येथील कंत्राटी अस्थाई कामगारांना बऱ्याच वर्षांपासून न्याय मिळत नसल्याने कोणत्याही सुख सोई मिळत नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. त्यात गटार कामगार झाडुवाले, स्वछता कामगार, घंटागाडीवरील कामगार ड्रायवर अशा लोकांना मूलभूत सुख सुविधा नगरपालिका व ठेकेदार यांच्याकडून सतत दुर्लक्ष होतेय. म्हणून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कामगार नेते व प्रदेश महामंत्री जगनभाई सोनवणे यांच्या नेतृत्वात चोपडा येथे कामगारांच्या न्यायहक्का साठी एक समिती नेमण्यात आली आहे. लवकरच जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री यांच्याकडे मागण्यांचे निवेदन जगनभाई सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली देणार असल्याचे सांगण्यात आले.
चोपडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिर सभागृहात कर्मचाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी भगवान गौतम बुध्द व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पत्रकार मिलिंद सोनवणे यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे मार्गदर्शक म्हणून व्यासपीठावर जगनभाई सोनवणे, हरीश सुरवाडे, सामाजिक कार्यकर्ते रुपेश भालेराव, परशुराम करनकाळ, संजय अहिरे उपस्थित होते. जगनभाई सोनवणे यांनी कामगारांच्या व्यथा ऐकून घेतल्या व लवकरच जिल्हाधिकारी व मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊ भेटू, असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल वाडे यांनी केले. यावेळी कामगार युनीयन स्थापन करण्यात आली अध्यक्ष म्हणून सिद्धार्थ नंदू शिरसाठ, उपाध्यक्ष अर्जुन भालेराव, सचिव विठ्ठल बैसाणे,खजिनदार अनिल वाडे,सल्लागार संजय अहिरे,सदस्य विठ्ठल वाडे,दीपक सोनवणे,प्रकाश बाविस्कर, विजय मराठे,संदीप वाडे,अनिल महाजन, गणेश सपकाळे, प्रशांत बाविस्कर,कैलास शिंदे, विशाल सपकाळे, शुभम बारेला,राजू मराठे,आनंद शिंदे,संतोष गोलाईत, आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाला शेकडो महिला व पुरुष कर्मचारी हजर होते.
हेही वाचा : Special Interview : 7 हजार 200 कोटींचा प्रकल्प; जळगाव जिल्ह्यातील सात तालुक्यांना होणार मोठा फायदा