जालना, 19 जुलै : प्रशासनाला किंवा सरकार भेटीला आले नाही म्हणून उद्याचे उपोषण थांबणार नाही. आता मघार नाहीच, उद्या ठीक सकाळी 10 वाजेपासून अंतरावालीत कठोर उपोषण करणार, असा निर्धार मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे. जरांगे यांचे उद्यापासून आमरण उपोषण सुरू होत असल्याने त्यांनी आज संध्याकाळी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांच्या उपोषणाबाबत माहिती दिली.
काय म्हणाले मनोज जरांगे? –
मनोज जरांगे यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना सांगितले की, सरकरला माझी विनंती आहे की, आतपर्यंत सगेसोयऱ्यांपासून ते तीनही गॅजेट जे काही तुम्ही दिले आहे. ज्या मराठा समाजातील बांधवांच्या नोंदी सापडल्या आहेत, यावरून मागेल त्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र दिले पाहिजे. त्यासाठी सरकारने निर्णय करणे गरजेचे आहे.
राज्यात सुरू असलेल्या भरतींमध्ये मराठा उमेदवारांना अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जातोय. कुणबी प्रमाणपत्र अथवा 10 टक्के एसइबीसीचे देखील प्रमाणपत्र त्या उमेदवारांचे नाकारले जातेय, तसेच त्यांना ओपनमधून भरती देण्याचा पर्याय दिला जातोय. कारण यामुळे मराठा उमेदवारांचे नुकसान होत आहे. यावरून माझे सरकारला एकच सांगणे आहे की, एसइबीसीचा किंवा कुणबी प्रमाणपत्राचा पर्याय ठेवला पाहिजे, असे जरांगे म्हणाले.
मुलींना मोफत शिक्षण केले असताना व्हॅलिडिटीची अट घातली जातेय. मुलींना मोफत शिक्षणासाठी याप्रकारची कुठलीही अट नको पाहिजे. तसेच लाडका बहिण-भाऊ योजना आणून मतदान विकत घेतल्यासारखे करत आहे. या योजनांचे आमिष दाखवून तुम्ही धनगर-मुस्लिम तसेच मराठ्यांना आरक्षणाच्या मुद्यापासून बाजूला ढकलले जात आहे, असेही मनोज जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे यांचे उद्यापासून उपोषण –
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातील अंतरवाली येथे आमरण उपोषणाचा हाक दिली आहे. उद्या सकाळी दहा वाजेपासून या उपोषणाला सुरूवात होणार आहे. आतापर्यंत जरांगे यांनी केलेल्या आमरण उपोषणाच्यावेळी सरकारने दिलेली आश्वासने पुर्ण केली नसल्याने जरांगे पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार आहेत.
हेही वाचा : Pooja Khedkar : UPSC ने पूजा खेडकर यांच्याविरोधात केले FIR दाखल, काय आहे संपुर्ण बातमी?