जळगाव, 1 ऑगस्ट : महाराष्ट्रात जुलै महिन्याच्या अखेरीस सर्वत्र जोरदार पाऊस झाला. यामुळे पुण्यासाह पश्चिम महाराष्ट्रात पुरस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, राज्यात आजपासून पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार आहे. हवामान विभागाकडून आज 1 ऑगस्टला रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज तर मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला यलो अलर्ट दिला आहे.
आजपासून पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार –
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पुन्हा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. परवा शनिवार तसेच रविवार रोजी पावसाचा जोर अधिक असू शकतो. दरम्यान, 5 ऑगस्टपासून कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज –
जळगाव जिल्ह्यात मागच्या आठवड्यात संततधार पाऊस झाल्याने शेतीची विविध कामे प्रलंबित पडली होती. दरम्यान, काल सकाळी पावसाने उघडीप दिल्याने शेती कामांना वेग आला. तसेच काल सायंकाळी विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील विविध भागात आज मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा : मोठी बातमी! रेशनचं होणार ऑफलाइन वितरण, मंत्री छगन भुजबळ यांचे आदेश, काय आहे संपुर्ण प्रकरण?