जळगाव, 5 ऑगस्ट : गेल्या आठवडाभरापासून जळगाव जिल्ह्यात कुठे मुसळधार तर कुठे संततधार पाऊस पडत होता. मात्र, सध्यास्थितीत जळगाव जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. गेल्या आठवडाभरापासून शेतकरी पावसाच्या विश्रांतीच्या प्रतिक्षेत होते. दरम्यान, पावसाने विश्रांती घेतल्याने आज शेतीकामांना वेग आला आहे.
जिल्ह्यात अतिपावसामुळे पिकांना धोका? –
गेल्या आठवडाभरापासून जळगाव जिल्ह्याच्या अनेक भागात संततधार पाऊस सुरू आहे. तर दुसरीकडे पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव या तालुक्यांमध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. वरील तीन तालुके वगळता इतर ठिकाणी दररोज पाऊस सुरू असल्याने शेतकरी पावसाच्या विश्रांतीच्या प्रतिक्षेत होते. दरम्यान, संततधार पावसामुळे पिकांची वाढ खुंटली आहे असून पावसामुळे पाने पिवळी पडू लागलेले आहेत. जिल्ह्यातील खरीप पिकांना अतिपावसामुळे धोका वाढला असल्याची परिस्थिती आहे.
जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज –
जळगाव जिल्ह्यात आजपासून येत्या 11 ऑगस्टपर्यंत जोरदार पावसाची शक्यता कमीच आहे. जिल्ह्यात आठवडाभर काही ठरावीक तालुक्यांमध्ये किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. जिल्ह्यात काही अंशी ढगाळ वातावरण राहू शकते. दरम्यान, 70 टक्के उघडीप मिळण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, आठवडाभरापासून शेतकऱ्यांची रखडलेली कामे त्यांना आता पुर्ण करता येणार आहे.
हेही वाचा : जवान सुटीवर आला अन् पत्नी व तिच्या प्रियकराने घात केला, कोल्हापुरातील हादरवणारी घटना