• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक कधी?, केंद्रीय निवडणूक आयोगाने कारण सांगितले, काय आहे संपुर्ण बातमी?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 16, 2024
in देश-विदेश, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक कधी?, केंद्रीय निवडणूक आयोगाने कारण सांगितले, काय आहे संपुर्ण बातमी?

नवी दिल्ली, 16 ऑगस्ट : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दुपारी पत्रकार परिषद घेत हरियाणा आणि जम्मू काश्मिर या दोन राज्यांतील विधानसभा निवडणूकीची घोषणा केली. असे असताना हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन राज्यांची निवडणूक 2019 साली सोबत करण्यात आली होती. मात्र, यावेळेस महाराष्ट्राची निवडणूक हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या राज्यांसोबत विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान, याचे कारणही केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलंय.

मुख्य निवडणूक आयुक्तांनी काय सांगितलंय –
महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आज जाहीर करण्यात आलेली नाही. यावरून उपस्थित पत्रकारांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीबाबत प्रश्न उपस्थित केला असता राजीव कुमार यांनी यावर स्पष्टीकरण दिले. राजीव कुमार म्हणाले की, महाराष्ट्र आणि हरियाणाची निवडणूक सोबत झाली होती. हरियाणाची मुदत 3 नोव्हेंबर होती तर महाराष्ट्राची 26 नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यावेळी जम्मू-काश्मीर या राज्याचा मुद्दा नव्हता. मात्र, यावेळी पाच राज्यातील निवडणुकांचा मुद्दा आहे. महाराष्ट्र, हरियाणा, जम्मू काश्मीर, झारखंड आणि दिल्ली अशा पाच राज्यांची विधानसभा निवडणूक आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा बलांचा मुद्दा आहे. महाराष्ट्रात पाऊस झाला होता त्यामुळे बीएलओची कामे झालेली नाहीत. गणेशोत्सव, पितृपक्ष, नवरात्री, दिवाळी असे अनेक सणही आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करुन दोन राज्यांच्या निवडणुका सोबत घेण्याचा निर्णय घेतला, असे राजीव कुमार म्हणाले.

कलम 370 नंतर पहिल्यांदाच जम्मू काश्मिरात निवडणूकांची घोषणा –
केंद्र सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवले होते. असे असताना जवळपास 10 वर्षानंतर जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका होणार आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर 2024 अशा तीन टप्प्यात मतदान होणार आहे. तर 4 ऑक्टोबर रोजी त्याठिकाणी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरात जवळपास दहा वर्षांननंतर होणारी ही निवडणूक विशेष मानली जात आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा बलांची मदत देखील घेतली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हरिणायात एका टप्प्यात होणार निवडणूक –
हरियाणा विधानसभेतील सदस्यसंख्या 90 इतकी असून हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ 3 नोव्हेंबरला संपणार आहे. गेल्यावेळी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि जेजेपीने सत्ता स्थापन केली होती. हरियाणात एनडीएकडे 43 आणि इंडिया आघाडीकडे 42 आमदारांचे संख्याबळ आहे. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने आज जाहीर केलेल्या तारखेनुसार, हरियाणाच्या सगळ्या जागांवर 1 ऑक्टोबरला मतदान होईल आणि जम्मू-काश्मीरप्रमाणे निवडणुकांचा निकाल 4 ऑक्टोबर रोजी लागणार आहे.

हेही वाचा : Video : नार-पारचा मुद्दा, मंत्री गुलाबराव पाटील आक्रमक; उपमुख्यमंत्र्यांनी दिलं स्पष्ठीकरण, नेमकं काय घडलं?

बातमी शेअर करा !
Share
Tags: assembly electioncentral election commissionrajiv kumarsuvarana khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी मंत्री आमदार एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवात सर्वपक्षीय दिग्गजांची मांदियाळी; शरद पवारांकडून भाजप विस्तारातील योगदानाचे कौतुक

माजी मंत्री आमदार एकनाथ खडसेंच्या अमृत महोत्सवात सर्वपक्षीय दिग्गजांची मांदियाळी; शरद पवारांकडून भाजप विस्तारातील योगदानाचे कौतुक

August 30, 2026
नेपाळमधून 143 भाविक मायभूमीत परतले; प्रशासनाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे परतीचा प्रवास सुरक्षित, कुटुंबीयांना आनंदाश्रू

नेपाळमधून 143 भाविक मायभूमीत परतले; प्रशासनाच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे परतीचा प्रवास सुरक्षित, कुटुंबीयांना आनंदाश्रू

August 30, 2026
ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

August 29, 2026
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

August 29, 2026
‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

August 29, 2026
‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

August 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page