• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Breaking : नेपाल दुर्घटनेतील 25 जणांचे मृतदेह जळगाव विमानतळावरून गावाकडे रवाना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 24, 2024
in जळगाव जिल्हा, खान्देश, ताज्या बातम्या, देश-विदेश, ब्रेकिंग, भुसावळ, महाराष्ट्र
Breaking : नेपाल दुर्घटनेतील 25 जणांचे मृतदेह जळगाव विमानतळावरून गावाकडे रवाना

जळगाव, 24 ऑगस्ट : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातून नेपाळमधील पशुपतिनाथ येथे दर्शनाला गेलेल्या भाविकांची बस 500 फूट उंचावरुन नदीत कोसळली. या भीषण अपघातात आतापर्यंत 27 भाविकांचा मृत्यू झाला. दरम्यान, नेपाळ दुर्घटनेतील 25 जणांचे मृतदेह आज जळगाव विमानतळावर आणण्यात आले. यानंतर संपूर्ण शासकीय प्रक्रिया पूर्ण करून नातेवाईकांना सुपूर्द करत रवाना करण्यात आले आहेत.

वायुदलाच्या विशेष विमानाने जळगावात मृतदेह आणले –
नेपाळ दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव कार्य आणि पुढील कारवाई लवकरात लवकर व्हावी, यासाठी काल जिल्हा प्रशासनाच्यावतीने युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात होते. यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यासह आमदार संजय सावकारे ह्या काल रात्रीच जळगावरून रात्री उशिराने मुंबईकडे रवाना झाल्या होत्या. यानंतर आज सकाळी त्या नेपाळमधील काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचत सर्व माहिती घेतली.

वरणगावच्या दिशेने मृतदेह रवाना –
नेपाळ मध्ये झालेल्या दुर्दैवी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या जळगांव जिल्ह्यातील नागरिकांचे 25 पार्थिव घेऊन भारतीय वायु दलाच्या विमान सायंकाळी रवाना झाले होते. दरम्यान, नेपाळ दुर्घटनेतील 25 जणांचे मृतदेह आता रात्री जळगाव विमानतळावर वायुदलाच्या विशेष विमानाने आणले. संपूर्ण शासकीय प्रक्रिया पूर्ण करून नातेवाईकांना सुपूर्द केले. यानंतर अॅम्बुलन्सने ते मृतदेह वरणगावच्या दिशेने रवाना झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

दुर्देवी दुर्घटनेत मृत्यू पडलेल्या व्यक्तींची नावे आणि त्यांची गावे –
प्रकाश नथ्थू कोळी (सुखडे), तळवेल. रोहिणी सुधाकर जावळे, वरणगाव. पल्लवी संदिप सरोदे, वरणगाव, अनिता अविनाश पाटील दर्यापूर. सरोज मनोज भिरुड, जळगाव/तळवेल, सुलभा पाडुरंग भारंबे, भुसावळ. गणेश पाडुरंग भारंबे, भुसावळ. मिनल गणेश भांरबे, भुसावळ. परी गणेश भारंबे, भुसावळ. विजया कडू जावळे, वरणगाव. निलिमा चंद्रकांत जावळे, वरणगाव. संदिप राजाराम सरोदे, वरणगाव. तुळशिराम बुधा तायडे, तळवेल. सुहास प्रभाकर राणे, तळवेल. निलिमा सुनिल धांडे, भुसावळ. भारती प्रकाश जावळे, वरणगाव, सागर तडु जावळे, वरणगाव. आशा समाधान बाविस्कर, तळवेल. सरला तुळशिराम तायडे, तळवेल. अनुप हेमराज सरोदे, सरला सुहास राणे, तळवेल. पंकज भागवत भंगाळे, वरणगाव. मंगला विलास राणे, तळवेल. रिंकु चंदना सुहास राणे, तळवेल. सुधाकर बळीराम जावळे, वरणगाव.

जळगाव विमानतळावर यांची होती उपस्थिती –
केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षाताई खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आ. सुरेश ( राजूमामा ) भोळे आ. संजय सावकारे,आ. मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कस्टम विभागाचे अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील, संबंधित अधिकारी, उपस्थित होते.

नेपाळ बस अपघात दुर्घटना –
नेपाळमधील पशुपतीनाथ येथे दर्शनासाठी गेलेल्या पर्यटकांची बस तनहू जिल्ह्यातील मार्सयागडी नदीत कोसळल्याने 27 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 16 पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर काठमांडूसह तनहू रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये काहीजण जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव, पिंपळगाव तळवेल, गाळेगाव मधील आहेत. यानंतर जळगाव जिल्हा प्रशासनच्यावतीने दिल्ली तसेच नेपाळ सरकारमधील अधिकाऱ्यांसोबत संपर्क करण्यात आला. याबाबतची माहिती त्याठिकाणाहून घेण्यात आली होती.

हेही वाचा : भुसावळमधील भाविकांसोबत दुर्दैवी घटना, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे नेपाळमध्ये दाखल

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon airportnepal bus accidentsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! जळगाव जिल्ह्यात घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथक स्थापन

मोठी बातमी! जळगाव जिल्ह्यात घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथक स्थापन

March 11, 2026
VIDEO | दुग्ध प्रक्रिया उद्योगासाठी एकसमान वीज दर लागू करण्याबाबतचा मुद्दा; आमदार अनिल पाटील यांचा प्रश्न अन् मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

VIDEO | दुग्ध प्रक्रिया उद्योगासाठी एकसमान वीज दर लागू करण्याबाबतचा मुद्दा; आमदार अनिल पाटील यांचा प्रश्न अन् मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

March 11, 2026
चाळीसगावसह राज्यात 11 नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय; महसूलमंत्र्यांची विधानसभेत माहिती

चाळीसगावसह राज्यात 11 नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय; महसूलमंत्र्यांची विधानसभेत माहिती

March 11, 2026
कुंभमेळ्याची कामे प्राधान्याने आणि गुणवत्तापूर्ण करा; मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला सूचना

कुंभमेळ्याची कामे प्राधान्याने आणि गुणवत्तापूर्ण करा; मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला सूचना

March 11, 2026
VIDEO | बनावट अपघात घडल्याचा बनाव करून तब्बल 50 लाख रुपयांचा विमा भरपाई लाटण्याचा डाव; पोलिसांकडून 9 आरोपींना अटक

VIDEO | बनावट अपघात घडल्याचा बनाव करून तब्बल 50 लाख रुपयांचा विमा भरपाई लाटण्याचा डाव; पोलिसांकडून 9 आरोपींना अटक

March 10, 2026
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू; राज्यमंत्री माधुरी मिसाळ

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू; राज्यमंत्री माधुरी मिसाळ

March 10, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page