• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home Uncategorized

भुसावळमधील भाविकांसोबत दुर्दैवी घटना, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे नेपाळमध्ये दाखल, Photos

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 24, 2024
in Uncategorized
भुसावळमधील भाविकांसोबत दुर्दैवी घटना, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे नेपाळमध्ये दाखल, Photos

काठमांडू (नेपाळ), 24 ऑगस्ट : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातून नेपाळमधील पशुपतिनाथ येथे दर्शनाला गेलेल्या भाविकांची बस 500 फूट उंचावरुन नदीत कोसळली. या भीषण अपघातात आतापर्यंत 27 भाविकांचा मृत्यू झालाय. दरम्यान, केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे ह्या नेपाळमधील काठमांडू येथे पोहचल्या असून त्यांनी सदर घटनेबाबत बचाव कार्य आणि पुढील कारवाईबाबत माहिती घेतलीय.

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे नेपाळमध्ये दाखल –
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे ह्या काल रात्रीच जळगावरून रात्री उशिराने मुंबईकडे रवाना झाल्या होत्या. यानंतर आज सकाळी त्या नेपाळमधील काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाल्या. दरम्यान, त्यांनी भारतीय राजदूत नवीन श्रीवास्तव आणि नेपाळ परराष्ट्र व्यवहार मंत्रालय सहसचिव ब्रिघू ढुंगाना यांच्यासोबत बचाव कार्य आणि पुढील कारवाईबाबत माहिती घेतलीय. दरम्यान, नेपाळच्या बस अपघातातील जखमींना वाचविण्याचे पूर्ण प्रयत्न केले जात असल्याची माहिती समोर आलीय. दरम्यान, रक्षा खडसे यांच्यासोबत भुसावळचे आमदार संजय सावकारे हे देखील उपस्थित आहेत.

नेपाळ बस अपघात दुर्घटना –
नेपाळमधील पशुपतीनाथ येथे दर्शनासाठी गेलेल्या पर्यटकांची बस तनहू जिल्ह्यातील मार्सयागडी नदीत कोसळल्याने 27 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 16 पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर काठमांडूसह तनहू रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

मृतांमध्ये काहीजण जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव, पिंपळगाव तळवेल, गाळेगाव मधील आहेत. यानंतर जळगाव जिल्हा प्रशासनच्यावतीने दिल्ली तसेच नेपाळ सरकारमधील अधिकाऱ्यांसोबत संपर्क करण्यात आला. याबाबतची माहिती त्याठिकाणाहून घेण्यात आली.

दरम्यान, नेपाळ बस अपघात दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत संवाद साधला. दरम्यान, आज शनिवारी या दुर्दैवी अपघात मृत पावलेल्यांचे मृतदेह नाशिक विमानतळावर आणण्यात येणार आहेत. यानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात ते देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

हेही वाचा : नेपाळ बस दुर्घटना ताजी अपडेट, मुख्यमंत्र्यांचा केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत संवाद, वायुसेनेच्या विमानाने शनिवारी मृतदेह महाराष्ट्रात आणणार

बातमी शेअर करा !
Share
Tags: latest breaking newsmla sanjay sawakarenepal bus accidentsuvarna khandesh liveunion state minister raksha khadse

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page