• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

अल्पसंख्याकांना समन्यायी राजकीय प्रतिनिधित्व देण्यासाठी आम्ही सक्रीयपणे काम करतोय – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उदगीर येथे जनसन्मान यात्रेदरम्यान वक्तव्य

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 30, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
अल्पसंख्याकांना समन्यायी राजकीय प्रतिनिधित्व देण्यासाठी आम्ही सक्रीयपणे काम करतोय – उपमुख्यमंत्री अजित पवार

लातूर, 30 सप्टेंबर : अल्पसंख्याकांना समन्यायी राजकीय प्रतिनिधित्व देण्यासाठी आम्ही सक्रीयपणे काम करत असून अल्पसंख्याकांना योग्य प्रतिनिधित्व देण्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज लातूर जिल्ह्यातील उदगीर विधानसभा मतदारसंघात पोहोचली. या जनसंपर्क यात्रेत कार्यक्रमाला परिसरातील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी उदगीरचे विधानसभेत प्रतिनिधित्व करणारे क्रीडा व युवक कल्याण व बंदर विकास मंत्री संजय बनसोडे उपमुख्यमंत्र्यांसमवेत उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले? –
उदगीरमधील जनसन्मान यात्रेत उपस्थितांसोबत संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अंगणवाडी सेविकांचे मानधन 10 हजार रुपयांवरून 15 हजार रुपये करून महाराष्ट्र सरकारने प्रलंबित मागण्या पूर्ण केल्या आहेत. तसेच अल्पसंख्याकांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी आम्ही सक्रीयपणे काम करत आहोत. तसेच राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष असून यामध्ये डॉ. अफसर शेख व नाझेर काझी हे उत्तम काम करत आहेत, असा पुनरुच्चार त्यांनी केला. आम्ही सर्वांसोबत सर्वसमावेशकपणे काम करण्यास कटिबद्ध आहोत, आम्ही सर्व भारतीय आहोत. उदगीर हे भारताचे सार प्रतिबिंबित करते आणि आपण सामाजिक सलोखा राखला पाहिजे, असे देखील अजित पवार यावेळी म्हणाले.

संजय बनसोडे यांच्या कामगिरीबाबत काय म्हणाले? –
या भागातील विकासाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, पंचायत समिती, तहसील कार्यालय आणि प्रशासकीय इमारतीसह अनेक इमारतींचे आम्ही उद्घाटन केले आहे. उदगीरला कृषी वस्तू व्यापार केंद्र म्हणूनही मान्यता आहे. तसेच जनतेने दिलेल्या पाठिंब्यामुळे आणि आपल्या कामगिरीतून त्यांनी स्वत:ला सिद्ध केले आहे. आम्ही त्यांच्या कामावर खूश आहोत, असे यावेळी मंत्री संजय बनसोडे यांनी या भागाच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करताना अजित पवार म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन –
उदगीरच्या सांस्कृतिक वारसाबद्दल बोलताना ते म्हणाले, उदगीरला समृद्ध सांस्कृतिक आणि राजकीय वारसा लाभला असून प्राचीन काळापासून तो आध्यात्मिक महत्त्वासाठी ओळखला जातो. लातूर विमानतळाच्या विकासासाठी नाइट लँडिंग सुविधेसह सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. दरम्यान, संजय बनसोडे यांना मतदान करण्याची विनंती अजित पवार यांनी उपस्थित जनतेला केली. तसेच महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर जनतेच्या पाठिंब्याची गरज आहे, असे सांगून आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी व महायुतीला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले. तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहिलात तर आम्ही तुमच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणू, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.

हेही पाहा : जळगाव जिल्ह्यात ‘या’ तारखेपासून पुन्हा पावसाची शक्यता, आजचा काय आहे नेमका हवामान अंदाज?

बातमी शेअर करा !
Share
Tags: ajit pawar latest newsdcm ajit pawarjansanman yatrajansanman yatra in udgirlatur districtsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सातगाव डोंगरी येथील जि.प. शाळेसाठी ग्रामपंचायतच्यावतीने एलईडी अँड्राईड टीव्ही भेट

सातगाव डोंगरी येथील जि.प. शाळेसाठी ग्रामपंचायतच्यावतीने एलईडी अँड्राईड टीव्ही भेट

March 14, 2026
रिंगणगाव येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात; विविध योजनांचा शेकडो लाभार्थ्यांना मिळाला लाभ

रिंगणगाव येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात; विविध योजनांचा शेकडो लाभार्थ्यांना मिळाला लाभ

March 14, 2026
गोवा सरकारकडून 42 कुटुंबांना सहानुभूती (Compassionate) नियुक्तीचा आधार

गोवा सरकारकडून 42 कुटुंबांना सहानुभूती (Compassionate) नियुक्तीचा आधार

March 14, 2026
भातखंडे येथील जि.प. मराठी शाळेत बारामती कॅटल फिड्स प्रायव्हेटच्यावतीने विद्यार्थ्यांना टिफिन डबे आणि टिफीन बॅग मोफत वाटप

भातखंडे येथील जि.प. मराठी शाळेत बारामती कॅटल फिड्स प्रायव्हेटच्यावतीने विद्यार्थ्यांना टिफिन डबे आणि टिफीन बॅग मोफत वाटप

March 14, 2026
किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 19 | आईच्या आठवणीने भावूक झाली ब्रिटिश गव्हर्नरची नात!

किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 19 | आईच्या आठवणीने भावूक झाली ब्रिटिश गव्हर्नरची नात!

March 14, 2026
आधी प्रेमसंबंध अन् त्यातून ब्लॅकमेलिंग; पती-पत्नीने मिळून प्रियकराला संपवलं, पाचोरा तालुक्यातील नेमकी घटना काय?

आधी प्रेमसंबंध अन् त्यातून ब्लॅकमेलिंग; पती-पत्नीने मिळून प्रियकराला संपवलं, पाचोरा तालुक्यातील नेमकी घटना काय?

March 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page