जळगाव, 30 सप्टेंबर : जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. दरम्यान, पुन्हा एकदा जळगाव जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून 7 ऑक्टोबरपासून पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यात ‘या’ तारखेपासून पाऊस –
जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाल्यानंतर शनिवार आणि रविवार पावसाने विश्रांती घेतली. असे असताना पुढील काही दिवस पावसाची शक्यता कमी असली तरी 7 ऑक्टोबर पासून जळगाव जिल्ह्यात दमदरा पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागात शेतीपिकांचे नुकसान झाले आहे.
काय आहे आजचा हवामान अंदाज? –
गुजरात आणि पश्चिम मध्य प्रदेशवर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली असून गुजरातमधील चक्रीय स्थितीमुळे आज कोकण, गोवा, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच राज्याच्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, आज जळगाव जिल्ह्यात काही ढगाळ वातावरण राहणार असून हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हेही पाहा : Jalgaon जिल्ह्यातील एमरजन्सी लोडशेडिंग कधी बंद होणार?, IAS Ayush Prasad Exclusive Interview