• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

शेतकऱ्याकडे मागितली 1300 रुपयांची लाच, पाचोरा तालुक्यातील ‘या’ व्यक्तीला पकडले रंगेहाथ

पाचोरा तालुक्यातील बांबरूड राणीचे येथील भगवान दशरथ कुंभार (वय-44 वर्ष) या व्यक्तीला 1360 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 17, 2023
in पाचोरा, क्राईम, जळगाव जिल्हा
शेतकऱ्याकडे मागितली 1300 रुपयांची लाच, पाचोरा तालुक्यातील ‘या’ व्यक्तीला पकडले रंगेहाथ

फाईल फोटो

पाचोरा (प्रतिनिधी), 17 मे : पाचोरा तालुक्यातून एक लाचखोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाचोरा तालुक्यातील बांबरूड राणीचे येथील भगवान दशरथ कुंभार (वय-44 वर्ष) या व्यक्तीला 1360 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.

काय आहे संपूर्ण प्रकरण –

तक्रारदार यांची लासगाव शिवारात आईच्या नावे शेत गट क्रं.128/ब/1 हीचे क्षेत्र 0.91हेक्टर आर चौ.मी क्षेत्र असलेली शेत जमीन आहे. सदर शेतजमीनीवर तक्रारदार यांच्या आईच्या नावे बँक ऑफ बडोदा शांखा -सामनेर या बँकेकडून 1 लाख 30 हजार रुपये पीककर्ज मंजुर करण्यात आले आहे. तरी सदर मंजुर झालेल्या पिककर्जाचा बोझा शेतजमिनीचे 7/12 उताऱ्यावर घेण्यासाठी तक्रारदार व्यक्ती बांबरुड तलाठी कार्यालयात गेले होते.

यावेळी सदर कार्यालयात भगवान दशरथ कुंभार (वय-44 वर्ष) या खासगी व्यक्तीने तक्रारदार यांना माझे तलाठी अप्पांशी चांगले संबंध आहेत, तुमच्या आईच्या नावे मंजुर झालेल्या पिककर्जाचा बोझा शेतजमीनीचे 7/12 उताऱ्यावर लावण्याचे काम तलाठी अप्पांकडून करून आणून देतो, असे सांगितले तसेच या कामासाठी तक्रारदार यांच्या आईचे, तक्रारदार आणि साक्षीदाराचे आधारकार्ड, झेरॉक्स आणि आईचे 3 आणि तक्रारदार यांचे 2 पासपोर्ट फोटो सांगितले.

यासोबतच भगवान दशरथ कुंभार या व्यक्तीने तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष आईच्या नावे मंजुर झालेल्या पिककर्जाचा बोझा शेतजमीनीचे 7/12 उताऱ्यावर लावण्याचे काम तलाठी अप्पांकडून करून आणून देण्याच्या मोबदल्यात 1360/- रुपये लाचेची मागणी केली.

यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वी सापळा रचला आणि मागणी केलेली लाच रक्कम आरोपीला बांबरुड येथील त्यांचे स्वतःचे घरी पंचासमक्ष स्वतः स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

ही कारवाई सापळा पर्यवेक्षण अधिकारी शशिकांत पाटील (पोलिस उप अधीक्षक,ला.प्र.वि. जळगांव) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव यांच्यासोबत पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पो.ना. ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने, स.फौ. दिनेशसिंग पाटील, स.फौ. सुरेश पाटील, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर. यांनी केली.

अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो विभागाकडून आवाहन –

कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी व्यक्तीने कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी खाली दिलेल्या नंबरवर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो विभागाकडून करण्यात आले आहे.

अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव

@ दुरध्वनी क्र. 0257-2235477
@ मोबा.क्र. 8766412529
@ टोल फ्री क्र. 1064

बातमी शेअर करा !
Share
Tags: bribe newscrimecrime newspachora bribe newspachora crime news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page