• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

अत्यंत दुःखद घटना! जळगावच्या दाम्पत्याचा अपघाती मृत्यू; आज डोकलखेडा येथे अंत्यसंस्कार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 30, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
अत्यंत दुःखद घटना! जळगावच्या दाम्पत्याचा अपघाती मृत्यू; आज डोकलखेडा येथे अंत्यसंस्कार

जळगाव, 30 नोव्हेंबर : तेलंगणातील सीतापुरम येथून पाचोरा तालुक्यातील डोकलखेडा गावात लग्न समारंभासाठी निघालेल्या दाम्पत्याचा मृतदेह अखेर शनिवारी 29 डिसेंबर रोजी दुपारी विहिरीत आढळून आला. खामगाव–मलकापूर मार्गावरील वडनेर भोलजी उड्डाणपुलाजवळील झाडाझुडपांनी वेढलेल्या विहिरीत त्यांची कार आढळली असून, त्यातच दोन्ही जण मृत अवस्थेत सापडले. मृत दाम्पत्याची नावे पद्मसिंह दामू पाटील (49) आणि नम्रता पाटील (45) अशी असून त्यांच्यावर आज डोकलखेडा येथे दुपारी 1 वाजता अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. दरम्यान, दाम्पत्याच्या निधनामुळे गावावर शोककळा पसरली आहे.

दाम्पत्य झाले होते बेपत्ता –

सीतापुरममधील एका सिमेंट कंपनीत कार्यरत असलेले पद्मसिंह पत्नीसमवेत एमएच 13 बीएन 8483 या कारने 27 नोव्हेंबर रोजी डोकलखेड्याकडे निघाले होते. त्याच दिवशी सायंकाळी साधारण 6.30 वाजता त्यांचा नातेवाइकांशी शेवटचा संपर्क झाला. त्यानंतर, दोघांचेही फोन बंद येऊ लागल्याने नातेवाइकांनी चिंता व्यक्त केली होती.

बेपत्ता झाल्याने घेतला जात होता शोध –

नांदुरा–मलकापूर महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासूनही 28 नोव्हेंबरपर्यंत पोलिसांच्या हाती ठोस माहिती मिळाली नव्हती. शनिवारी सकाळी जिल्हा पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्रेणीक लोढा आणि डीवायएसपी आनंद महाजन यांनी नांदुरा पोलिस ठाण्यात आढावा बैठक घेतली. पोलिस निरीक्षक जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली शोधमोहीम तीव्र करण्यात आली, तरी दुपारपर्यंत काहीच धागादोरा लागला नव्हता.


दरम्यान, पोलिसांच्या प्राथमिक तपासणीत 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजून 31 मिनिटांनी दाम्पत्याने बाळापूर टोलनाका पार केल्याचे आढळले. मोबाईलचे शेवटचे लोकेशन नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी परिसरात मिळाले. त्यानंतर, नांदुरा पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार नोंदविण्यात आली होती.

दाम्पत्याचा मृतदेह आढळला –

पोलिसांच्या सखोल तपासानंतर, अखेर शनिवारी दुपारी सुमारे 2 वाजून 20 मिनिटांनी वडनेर उड्डाणपुलाजवळील झुडपांनी वेढलेल्या विहिरीत कारसह दोन्ही मृतदेह आढळून आले. दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी क्रेनच्या मदतीने कार बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली. दरम्यान, आज दुपारी 1 वाजता डोकलखेडा येथे मृत दाम्पत्यावर अंत्यसंस्कार पार पडणार आहे.

हेही वाचा : नगरपरिषद निवडणुकांसाठी 2 डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी; राज्य सरकारचा आदेश जारी

बातमी शेअर करा !
Share
Tags: accidentaccidental deathcar accident newsmarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page