• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

दूध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळीविरोधात कारवाई तीव्र करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 3, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
दूध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळीविरोधात कारवाई तीव्र करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

मुंबई, 3 जुलै: राज्यातील दूध व दुग्धजन्य पदार्थांसह अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत कारवाई अधिक प्रभावी करण्यात येत असून मनुष्यबळाची कमतरता दूर करणे, नवीन प्रयोगशाळा कार्यान्वित करणे आणि जिल्हास्तरावरील यंत्रणा बळकट करण्यासाठी शासन आवश्यक पावले उचलत आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेतील अर्धा तास चर्चेला उत्तर देताना दिली.

सदस्य हेमंत ओगले यांनी उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना मंत्री झिरवाळ म्हणाले की, दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी सक्षम कायदे अस्तित्वात आहेत. आता रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया गतीने सुरू असून अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात भरती करण्यात आली आहे.

राज्यात सध्या मुंबई, संभाजीनगर, पुणे आणि नागपूर येथे प्रयोगशाळा कार्यरत असून यवतमाळ, नाशिक आणि रायगड येथे नवीन प्रयोगशाळा उभारण्याचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्हास्तरावर अन्न व औषध प्रशासनाची कार्यालये अधिक सक्षम करण्यासाठी शासकीय कार्यालयांच्या परिसरात नागरिकांना सहज उपलब्ध होतील अशा ठिकाणी कार्यालये सुरू करण्याचा विचार सुरू आहे.

मंत्री झिरवाळ यांनी दूध भेसळीविरोधात अधिक कठोर कायदेशीर उपाययोजनांचा अभ्यास करण्यात येत असल्याचे यावेळी सांगितले. गुटखा प्रकरणांप्रमाणे कठोर कारवाईसंदर्भात कायदेशीर पर्यायांचा विचार केला जाईल तसेच दूध भेसळीविरोधातील स्वतंत्र कायद्याचा मसुदा अधिक प्रभावी करण्यासाठी पुनरावलोकन करण्यात आले असून तो लवकरच पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, भेसळमुक्त अन्नपदार्थ नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी विद्यमान कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करणे हीच सर्वात प्रभावी उपाययोजना असल्याचे नमूद करत मंत्री झिरवाळ यांनी अन्न सुरक्षा आणि ग्राहकांच्या आरोग्य संरक्षणासाठी शासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सुरेश धस यांनी सहभाग घेतला.

हेही वाचा: VIDEO | विधानसभेत आमदार सुरेश भोळे यांचा जळगावच्या प्रलंबित प्रश्नांवर आवाज; गाळेधारक, फेरीवाले धोरण आणि मनपा नोकरभरतीचा मुद्दा उपस्थित

बातमी शेअर करा !
Share
Tags: adulteration in milkmarathi newsmilk productsminister narhari zirwalsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्यातील शिवाजी नगर भागातील ‘चांदसी दवाखाना’ सील; बोगस डॉक्टरवर कारवाई

पाचोऱ्यातील शिवाजी नगर भागातील ‘चांदसी दवाखाना’ सील; बोगस डॉक्टरवर कारवाई

August 18, 2026
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अवयव प्रत्यारोपणासाठी 798 रुग्णांना 15.79 कोटींची मदत

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अवयव प्रत्यारोपणासाठी 798 रुग्णांना 15.79 कोटींची मदत

August 18, 2026
ग्रामसभेतील गदारोळानंतर ग्रामसेवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; पारोळा तालुक्यातील शिवरे येथील घटना

ग्रामसभेतील गदारोळानंतर ग्रामसेवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; पारोळा तालुक्यातील शिवरे येथील घटना

August 18, 2026
VIDEO | “दर्शन घेतानाच मला कानामध्ये…..!” नाशिकचे पालकमंत्री झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया

VIDEO | “दर्शन घेतानाच मला कानामध्ये…..!” नाशिकचे पालकमंत्री झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांची पहिली प्रतिक्रिया

August 17, 2026
राज्यात 1 हजार 440 डॉक्टरांची लवकरच नियुक्ती; सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

राज्यात 1 हजार 440 डॉक्टरांची लवकरच नियुक्ती; सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

August 17, 2026
धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत मोहमांडली येथे सर्वसमावेशक आरोग्य सेवा

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत मोहमांडली येथे सर्वसमावेशक आरोग्य सेवा

August 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page