• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home

अमळनेरात आजपासून सारस्वतांची मांदियाळी, साने गुरुजी साहित्य नगरीत प्रचंड उत्साह

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 2, 2024
in खान्देश, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
अमळनेरात आजपासून सारस्वतांची मांदियाळी, साने गुरुजी साहित्य नगरीत प्रचंड उत्साह

साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर, 1 फेब्रुवारी : अखिल भारतीय मराठी महामंडळाचे 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2 फेब्रुवारीपासून साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेरात सुरू होत आहे. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राज्यभरातील अनेक साहित्यिकांसह रसिक अमळनेरात दाखल झाले आहेत. साहित्य संमेलनामुळे सर्वत्र प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.

तब्बल 72 वर्षांनी अमळनेरात साहित्य संमेलन –
1952 साली साहित्य संमेलन झाल्यानंतर अमळनेरात पुन्हा एकदा 72 वर्षांनी हे संमेलन 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान होत आहे. साहित्य संमेलनासाठी साने गुरुजी साहित्य नगरीत तीन सभामंडप उभारण्यात आले आहेत. यातील सभामंडप क्रमांक एकमध्ये उद्घाटन समारंभ होईल. याआधी वाडी संस्थानपासून सकाळी 7.30 वाजता ग्रंथदिंडीस प्रारंभ होईल. ग्रंथदिंडीचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी महामंडळाच्या अध्यक्षा प्रा.उषा तांबे व जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते होईल.

सभामंडप क्रमांक 1 मधील कार्यक्रम –
2 रोजी सकाळी 10 वाजता प्रा. उषा तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण तसेच प्रकाशन कट्ट्याचे उद्घाटन होईल. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते ग्रंथदालनाचे उद्घाटन होईल.
सकाळी 10.30 वाजता संमेलनाचे उद्घाटन होईल. प्रसिद्ध साहित्यिक प्रा.डॉ. रवींद्र शोभणे अध्यक्षस्थानी असतील. लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन संमेलनाचे उद्घाटन करतील. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाषा-शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित राहतील.
दुपारी 2 वाजता बालमेळाव्यातील निवडक कार्यक्रमांचे सादरीकरण होईल. बालमेळाव्याचे समन्वयक एकनाथ आव्हाड मनोगत व्य्ाक्त करतील. भैय्यासाहेब मगर सूत्रसंचालन करतील.

दुपारी 3.30 वाजता राजकीय आणि सामाजिक प्रदूषण यावर संत साहित्य हाच उपाय या विषयावर परिसंवाद होईल. अमरावतीचे डॉ. मनोज तायडे अध्यक्षस्थानी असतील. यात मुंबईचे ॲड.धनराज वंजारी, लातूरचे डॉ. ज्ञानदेव राऊत, वाळवा येथील दि.बा. पाटील, बिदर येथील इंदुमती सुतार, धरणगाव येथील प्रा.चत्रभूज पाटील सहभागी होतील. सूत्रसंचालन प्रा.डॉ. प्रभाकर ज.जोशी करतील. सायंकाळी 5.30 वाजता कविसंमेलन होईल. रात्री 8.30 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होईल.

सभामंडप क्रमांक 2 मधील कार्यक्रम –
2 रोजी दुपारी 2 वाजता परिसंवाद होईल. ‌‘कसदार मराठी राजकीय साहित्याच्या प्रतीक्षेत वाचक’ या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी मुंबईचे प्रा.अविनाश कोल्हे असतील. दुपारी 3.30 वाजता ‌‘सयाजीराव गायकवाड यांचे साहित्यिक व सामाजिक योगदान’ या विषयावर परिसंवाद होईल. छत्रपती संभाजीनगरचे बाबा भांड अध्यक्षस्थानी असतील. यात पुणे येथील डॉ.केशव तुपे व अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.रमेश माने सहभागी होतील. दुपारी 4.30 वाजता ‌‘तृतीयपंथी समुदायाचे मराठी साहित्यातील चित्रण आणि स्थान’ या विषयावर परिसंवाद होईल. सायंकाळी 5.30 वाजता स्वातंत्र्य संग्रामातील जनजातींचे योगदान’ या विषयावर परिसंवाद होईल.

सभामंडप क्रमांक 3 मधील कार्यक्रम –
2 रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत कविकट्टा कार्यक्रम होईल. राजन लाखे आणि सहकारी या कविकट्ट्याचे संयोजक आहेत.

संमेलनास उपस्थितीचे आवाहन – तीन दिवस होणाऱ्या या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांतर्गत मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेरचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह नरेंद्र निकुंभ, शरद सोनवणे, सोमनाथ ब्रह्मे, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, कार्यकारी सदस्य प्रा. डॉ. पी. बी. भराटे, बन्सीलाल भागवत, स्नेहा एकतारे, संदीप घोरपडे, वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब मगर, प्रा. डॉ. सुरेश माहेश्वरी, प्रा.श्याम पवार, प्रा. शीला पाटील, स्वीकृत सदस्य अजय केले, बजरंगलाल अग्रवाल यांनी केले आहे.

हेही वाचा : Budjet 2024 : केंद्र सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले? वाचा सविस्तर माहिती

बातमी शेअर करा !
Share
Tags: 97th akhil bhartiya marathi sahitya sammelanakhil bharatiya sahitya sammelanakhil bhartiy sahitya sanmelan amalner

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा-भडगाव तालुक्यात वादळी पावसामुळे केळीबागांचे नुकसान; आमदार-खासदारांनी केली पाहणी; शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचे दिले आश्वासन

पाचोरा-भडगाव तालुक्यात वादळी पावसामुळे केळीबागांचे नुकसान; आमदार-खासदारांनी केली पाहणी; शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचे दिले आश्वासन

June 13, 2025
विमान अपघातानंतर पंतप्रधान अहमदाबादमध्ये पोहोचले; पीएम मोदी यांच्या आजच्या दौऱ्यातील तीन महत्वाचे मुद्दे

विमान अपघातानंतर पंतप्रधान अहमदाबादमध्ये पोहोचले; पीएम मोदी यांच्या आजच्या दौऱ्यातील तीन महत्वाचे मुद्दे

June 13, 2025
अहमदाबाद विमान अपघात; एका क्षणात घडला अनर्थ अन् 242 जणांचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडंल?

अहमदाबाद विमान अपघात; एका क्षणात घडला अनर्थ अन् 242 जणांचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडंल?

June 12, 2025
Pachora Taluka News : पाचोरा तालुक्यातील बांबरूड (रा.) येथे वादळी पावसामुळे केळी-मोसंबी बागांचे नुकसान

Pachora Taluka News : पाचोरा तालुक्यातील बांबरूड (रा.) येथे वादळी पावसामुळे केळी-मोसंबी बागांचे नुकसान

June 13, 2025
“माझ्या 25 वर्षांच्या इतिहासात मतदारसंघात असं वादळ पाहिलं नाही; तात्काळ शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी 100 टक्के प्रयत्नशील” – आमदार किशोर आप्पा पाटील

“माझ्या 25 वर्षांच्या इतिहासात मतदारसंघात असं वादळ पाहिलं नाही; तात्काळ शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी 100 टक्के प्रयत्नशील” – आमदार किशोर आप्पा पाटील

June 12, 2025
मोठी बातमी! अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात प्रवासी विमान कोसळलं; लंडनसाठी उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही क्षणातच अपघात

मोठी बातमी! अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात प्रवासी विमान कोसळलं; लंडनसाठी उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही क्षणातच अपघात

June 12, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page