शेरू शेख, प्रतिनिधी
नांदगाव तांडा (सोयगाव) : सोयगाव तालुक्यातील नांदगाव तांडा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज दिनांक 5 फेब्रुवारी सोमवार रोजी आनंद मेला उत्साहात पार पडला. या मध्ये विद्यार्थ्यांनी 20 स्टॉलची उभारणी केली होती.
विद्यार्थ्यांनी लावलेल्या स्टॉलमध्ये पानीपुरी, वड़ापाव, मुंगभजी, गुलाबजामुन, पावभाजी, खमन,असे विविध प्रकारचे पदार्थ विद्यार्थ्यांनी तयार केलेले होते. हे पदार्थ रूचकर व चविष्ट असल्याने ग्रामस्थांनी उपस्थित लावत कार्यक्रमाची शोभा वाढविली.
मुलांना शिक्षणाबरोबर व्यवसायिक शिक्षण मिळावे, ही या उपक्रमाची भुमिका होती. यात सहभागी विद्यार्थ्यांचे पालक व सरपंच अरुणाबाई पवार, उपसरपंच शेख अहमद, ग्रामसेविका नन्वरे मॅडम, सदस्य उखा चव्हाण, झावरु पवार, प्रवीण राठोड़, युवराज पवार व कैलास पवार व शिक्षक आर बी निकोसे, सैंदाणे सर, सुर्यवंशी सर, पाटील सर, पाटील मॅडम, आदी उपस्थित होते. दरम्यान, या कार्यक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.
हेही वाचा : Video : पाचोरा तालुक्यातील पिंप्री (सार्वे) येथे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम, पाहा व्हिडिओ