ईसा तडवी, प्रतिनिधी
पिंप्री (सार्वे), 5 फेब्रुवारी : पाचोरा तालुक्यातील पिंप्री (सार्वे) येथे नुकताच वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संघाचे पाचोरा तालुकाध्यक्ष किरण पाटील हे होते. या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये रिमिक्स नृत्य, नाटिका, छत्रपती शिवाजी महाराज जन्म प्रसंग, लावणी, लोकनृत्य असे विविध कलाप्रकार सादर करण्यात आले.
यांची होती उपस्थिती –
याप्रसंगी तुळजाई शिक्षण मंडळाचे पाचोरा उपाध्यक्ष निखिल, ज्ञानेश्वर अहिरे, डॉ. निळकंठ पाटील, अमोल बाविस्कर, अर्जुन दादा, के.डी पवार, गजानन लाधे, गोकुळ वाघ, वाघ सर, शाळेचे मुख्याध्यापक सागर पाटील, पिंप्री,सार्वे, सातगाव, नांदगाव तांडा, नांदगाव या गावचे सर्व मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र पाटील यांनी केले. तर आभार गुलाब पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.