भुसावळ, 4 सप्टेंबर : अभिव्यक्ती संघाद्वारे अंतरराष्ट्रीय हनुमान चालीसा आणि राम स्तुती पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अनिश मनोजकुमार हडपे या विद्यार्थ्याने न पाहता हनुमान चालीसेचे तोंडी वाचन केले. या स्पर्धेच्या अंतिम निर्णयात अनिश हडपेचा तृतीय क्रमांक आला.
अनिश मनोजकुमार हडपेचा तृतीय क्रमांक –
अनिश मनोजकुमार हडपे या विद्यार्थ्याला रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. अनिश मनोजकुमार हडपे व परिवाराने अभिव्यक्ती संघाचे मुख्य हरिशचंद्रजी ठक्कर यांनी एवढी सुंदर स्पर्धा आयोजित केल्याबद्दल आभार व्यक्त केले.
अनिश मनोजकुमार हडपे हा भुसावळ येथील सेंट अलॉयसीस स्कूलमधील वर्ग चौथीचा विद्यार्थी आहे. आपल्या या यशाचे सर्व श्रेय अनिश ने आपल्या आई वडिलांना व शिक्षकांना दिले आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय हनुमान चालीसा आणि राम स्तुती पठण स्पर्धेत अनिश मनोजकुमार हडपे याने तृतीय क्रमांक मिळवल्याने त्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
हेही वाचा : Video : “…..तर महाराजांचा पुतळा कोसळला नसता,” केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठ विधान