जळगाव, 22 सप्टेंबर : आश्रमशाळा कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्या मान्य झाल्याचा शासन आदेश निघेपर्यंत उपोषणावर ठाम असल्याची माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष बालाजी मुंडे यांनी दिली. दरम्यान, या उपोषणाला आश्रमशाळा कर्मचाऱ्यांनी बहुसंख्येने पुण्यात यावे. आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत बालाजी मुंडे तसचे सरचिटणीस किशन पुंड यांच्यामागे ठामपणे उभे राहावे, असे आवाहन नाशिक विभागीय अध्यक्ष प्रकाश मराठे तसेच राज्य सहचिटणीस प्रवीण पवार, जिल्हा चिटणीस भाजप युवा मोर्चा रुपेश पाटील यांनी केले आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
महाराष्ट्रात इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या खाजगी अनुदानित वि.जा.भ.ज.निवासी आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात संबंधित विभागाचे मंत्री अतुल सावे, शिक्षक आमदार विक्रम काळे, शिक्षक आमदार सुधाकर आडबाले यांच्या सोबत दि. 10 जुलै 2024 रोजी झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत निवेदनातील मागण्यांवर चर्चा होऊन इतिवृत्तांत देण्यात आला.
पुण्यात बेमुदत उपोषण –
शासनाकडून मागील 4 महिन्यांपासून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने दि. 30 सप्टेंबर 2024 रोजी पासून महाराष्ट्र आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघ व राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी हे इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे येथील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार आहेत.
कर्मचाऱ्यांची दिशाभूलीचा आरोप –
दोन महिन्यांत सदरील मागण्यांबाबत या सकारात्मक निर्णय घेण्यात येतील, असे आश्वासन देऊन कर्मचाऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. म्हणून द्वार राज्यातील त्रस्त व अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष बालाजी मुंडे व सरचिटणीस किशन पुंड यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
हेही पाहा : Yogendra Puranik Interview : जपानमधील मराठमोळे आमदार योगेंद्र पुराणिक यांची विशेष मुलाखत