जळगाव, 2 फेब्रुवारी : केळी पीक विम्याची रक्कम मिळावी, यासाठी जिल्हाभरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून आज सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर शिंगाडा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्हाभरातील केळी उत्पादक शेतकरी सहभागी झाले
काय संपूर्ण बातमी? –
केळी पीक विमा योजनेअंतर्गत विमा कंपनीने शेतात केळी असतानाही, शेतकऱ्यांचे विम्याचे प्रस्ताव नाकारले आले आहेत. यावरून जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून त्यांच्याकडून आज जिल्हाधिकारी कार्यलयावर शिंगाडा मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेतेदेखील या प्रश्नावर चांगलेच आक्रमक झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडविण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील 10 हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे प्रस्ताव विमा कंपनीने नाकारले आहेत. याबाबत महाराष्ट्र सुदूर संवेदन केंद्रकाडून (एमआरसॅक) जो अहवाल प्राप्त झाला आहे, त्या अहवालात ज्या शेतकऱ्यांच्या शेतात केळी लागवड होती. अशा शेतकऱ्यांचेही प्रस्ताव नाकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत खासदार उन्मेष पाटील यांनी बुधवारी कृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांची भेट घेत तक्रार केली.
हेही वाचा : पाडळसे प्रकल्पास निधी कमी पडू दिला जाणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार