चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
भुसावळ, 30 मे : भुसावळात काल रात्री अज्ञातांनी गोळीबार करत माजी नगरसेवक संतोष बारसे यांच्यासह सुनील राखुंडे यांची हत्या करण्यात आली. दरम्यान, गोळीबारात मृत झालेल्या या दोघांची एकाच वेळी अंत्ययात्रा निघाली. यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिकांचा सहभाग होता. या पार्श्वभूमीवर आज दिवसभर भुसावळात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलीस बंदोबस्तात निघाली अंत्ययात्रा –
भुसावळमध्ये गोळीबारात ठार झालेले माजी नगरसेवक संतोष बारसे व सुनील राखुंडे यांची आज एकाच वेळेस अंत्ययात्रा काढण्यात आली. मोठ्या पोलीस बंदोबस्तात अंत्ययात्रा काढून तापी नदीवरील वैकुंठ धाम येथे मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, गोळीबाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज भुसावळ शहरात घोषित बंद पाळण्यात आला.\
भुसावळ गोळीबार प्रकरण –
भुसावळ शहरातील माजी नगरसेवक संतोष बारसे यांच्यासोबत इतर तिघे जण जुना सातारा रोड भागात कारमधून जात होते. दरम्यान, त्यांची कार मरिमाता मंदिर परिसरजवळ येताच दबा धरून बसलेल्या दोघे अज्ञातांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये माजी नगरसेवक संतोष बारसे कारमध्ये जागेवरच कोसळले. दरम्यान, या गोळीबारात यामध्ये माजी नगरसेवक संतोष बारसे आणि त्यांच्यासोबत असलेले सुनील राखुंडे यांचा मृत्यू झाला. यानंतर भुसावळात मोठा तणाव निर्माण झाला होता. आज संतोष बारसे आणि सुनील राखुंडे यांच्यावर पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आला.
हेही वाचा : जळगाव जिल्हा हादरला! दोघांची गोळी झाडून हत्या, भुसावळात नेमकं काय घडलं?