जळगाव, 20 नोव्हेंबर : स्थानिक स्वराज्य निवडणुका जाहीर झाल्या असून जळगाव जिल्ह्यातील प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या जामनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी पुन्हा तिसऱ्यांदा नगराध्यक्ष बनण्याचा मान साधनाताई गिरीश महाजन यांनी मिळवला असून यावेळेस त्यांची बिनविरोध निवडून झाली. यानिमित्त आज दि. 20 नोव्हेंबर 2025 गुरूवार रोजी सायंकाळी 5 वाजता भाजप कार्यालय जी.एम. फाउंडेशन जळगाव येथे भाजपकडून जल्लोष साजरा करण्यात आला.
जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजू मामा) यांच्या प्रमुख उपस्थितीत फटाके फोडून, पेढे वाटप करून, घोळ ताशांच्या गजरात जल्लोष व आनंद साजरा करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी, माजी महापौर भारतीताई सोनवणे, नितीन भाऊ लड्डा, माजी जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, जिल्हा पदाधिकारी विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, राजेंद्र मराठे , राजेंद्र घुगे पाटील, रेखाताई वर्मा, गायत्रीताई राणे, सुरेखाताई तायडे, पितांबर भावसार, दिपक परदेशी, भूषण लाडवंजारी, मनोज भांडारकर, संजय शिंदे, मंडल अध्यक्ष आनंद सपकाळे, दीपमालाताई काळे, अजित राणे विनोद मराठे, अतुल बारी, गीतांजलीताई ठाकरे, रेखाताई कुलकर्णी, सविता बोरसे भाजपाचे माजी नगरसेवक मंडळ अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, व असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तिन्ही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज घेतले मागे –
नगराध्यपदासाठी साधनाताई महाजन यांच्याविरोधात काँग्रेसकडून रूपाली पारस ललवाणी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षातर्फे प्रतिभा संतोष झाल्टे आणि अजित पवार गटाच्या सरीता ज्ञानेश्वर बोरसे यांनी अर्ज दाखल केले होते. या पार्श्वभूमीवर ही लढत जोरदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी वैयक्तिक पातळीवर सक्रिय होत बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न केल्याच्या चर्चा समोर येत होत्या.
नगराध्यपदी साधनाताई महाजन यांची बिनविरोध निवड –
दरम्यान, या चर्चांना यश मिळाल्याने गुरुवारी तिन्ही विरोधी उमेदवारांनी एकाच वेळी माघार घेतली आणि बिनविरोध निवडीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला. आज गुरूवार 20 नोव्हेंबर रोजी दुपारी एकाच वेळी तिन्ही पक्षांच्या उमेदवारांनी माघार घेतली आणि साधनाताई महाजन यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर जामनेर तसेच जळगाव शहरात भाजपकडून विजयाचा गुलाल उधळत जल्लोष करण्यात आला.






