पारोळा/अमळनेर, 18 फेब्रुवारी : जळगाव जिल्हा केमिष्ट असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष सुनिल भंगाळे यांच्या वाढदिवसानिमित्त पारोळा मेडिकल असो तर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. पारोळा शहरातील बालाजी मंदिरात प्रसादालय हॉलमधे हे रक्तदान शिबिर पार पडले.
सुनील भंगाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबीरात 75 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात श्री व्यंकटेश अन्नदान महाप्रसाद समिती बालाजी संस्थान व रेडप्लस ब्लड सेंटर जळगाव यांनी मोलाचे सहकार्य केले.
अमळनेरात महाभिषेक व पूजा –
सुनील भंगाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केमिस्ट स्वाभिमान सप्ताह अंतर्गत नीम येथील श्री क्षेत्र कपिलेश्वर येथे सुनिल भाऊ भंगाळे यांच्या निरोगी व दिर्घायूष्यासाठी महाभिषेक व पूजा करण्यात आली. त्यानंतर तेथील पाठ शाळेतील जवळपास ५० साधकांची डॉ. अमोल अग्रवाल यांच्याकडून दंत तपासणी करण्यात आली. यावेळी सर्व साधकांना पोषण आहाराचे वाटप सचिन एजन्सी, अमळनेर यांच्या सौजन्याने करण्यात आले.
हेही वाचा : मनोज जरांगे यांचा सरकारला नवा इशारा; म्हणाले, ‘सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी झाली नाहीतर…..’